बाप्पांना सुरक्षेत निरोप देण्यासाठी यंत्रणा सज्ज!, security ready for ganpati visarjan
Zeenews logo
English   
Thursday, July 10, 2025 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
logo ganesha
 
top

बाप्पांना सुरक्षेत निरोप देण्यासाठी यंत्रणा सज्ज!

बाप्पांना सुरक्षेत निरोप देण्यासाठी यंत्रणा सज्ज! www.24taas.com, मुंबई
अनंत चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण मुंबईमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यावेळी २१ हजार ५०० पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सुरक्षेसाठी तैनात राहणार आहेत.

याचबरोबर एसआरपीएफ, आरएएफ, बीएसएच्या विशेष तुकड्याही सुरक्षेसाठी मागवण्यात आल्या आहेत. दहशतवादी हल्ल्याचा धोका बघता मुंबई क्राइम ब्रांच आणि एटीएसही लक्ष ठेवून असणार आहे. सीसीटीवीच्या माध्यमातून मुंबईच्या प्रत्येक विसर्जन स्थळांवर नजर ठेवण्यात येणार आहे. अडीच हजार ट्रॅफिक पोलिसही रस्त्यावर वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सज्ज राहतील. त्या दिवशी अनेक रस्त्यांवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. विसर्जन ठिकाणांवरील तब्बल ६० रस्त्यांवर नो पार्किंग जाहीर करण्यात आलीय. ४०० लाईफ गार्डस् समुद्रकिना-यांवर तैनात राहणार आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही पोलिसांनी केलंय.


First Published: Tuesday, September 25, 2012, 15:15

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आईडी:
ई-मेल आयडी:
 
 
dot
photo
chick
dot

विविध गणपती स्थानांची ओळख