'ग्लोबल' गणेश - Marathi News 24taas.com
Zeenews logo
English   
Sunday, July 13, 2025 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
logo ganesha
 
top

'ग्लोबल' गणेश

www.24taas.com, कोकण   कोकणातील गणेशोत्सव खासच. अशाच गणेशोत्सवाची कोकणात सध्या लगबग सुरु आहे. एकीकडे बाप्पा दुबईला निघाले आहेत, तर दुसरीकडे संगमेश्वरमधून ऑस्ट्रेलियातल्या डार्लिंग हार्बरला मोदक निघाले आहेत.   कोकणातील गणेशोत्सव म्हणजे सर्वांसाठी एक आनंदाची पर्वणीच. त्यामुळे बाप्पांच्या आगमनापूर्वीची तयारी सध्या जोरात सुरु आहे. विशेषत: मूर्तीकारांची खूपच लगबग सुरू आहे. विजेचा खेळखंडोबा गृहीत धरून मूर्तीकारांचे हात सध्या वेगानं फिरत आहेत. मात्र देवरुखचे मूर्तीकार आप्पा साळस्कर यांची वेगळीच गडबड सुरू आहे. इतर स्थानिक मूर्त्यांबरोबरच दुबईला जाणा-या गणपतीबाप्पाला घडवण्यात ते सध्या मग्न आहेत.     एका बाजूला गणपतीबाप्पा दुबईला जाण्यासाठी सज्ज झालेत. तर दुसरीकडे संगमेश्वरमध्ये घडशी कुटुंब आणि त्यांचे सुमारे 25 सहकारी मोदक तयार करण्यात गुंतलेत. अमेरिकेनंतर आता यंदा ऑस्ट्रेलियामध्ये खोब-याचे मोदक निघाले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियातल्या भारतीयांना आता डार्लिंग हार्बरवर मोदक खाण्याचा आनंद लुटता येणार आहेत. गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी तर जोशात सुरु आहे. मात्र आता प्रतीक्षा आहे ती केवळ बाप्पांच्या आगमनाची...    

First Published: Saturday, August 4, 2012, 10:36

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आईडी:
ई-मेल आयडी:
 
 
dot
photo
chick
dot

विविध गणपती स्थानांची ओळख