जेव्हा भुजबळ-सोमय्या येतात आमने-सामने! Chhagan Bhujbal & Kirit Somayya face to face and hug each other

जेव्हा भुजबळ-सोमय्या येतात आमने-सामने!

जेव्हा भुजबळ-सोमय्या येतात आमने-सामने!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

गणपती बाप्पा कधी काय चमत्कार घडवेल, याचा नेम नाही... विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या विलेपार्ल्यातल्या घरीही असाच एक राजकीय चमत्कार बाप्पानं घडवला. एकमेकांवर आगपाखड करणारे छगन भुजबळ आणि किरीट सोमय्या एकत्रच आले नाही तर चक्क गळाभेट करतांना दिसले.

तावडे यांच्या घरच्या दीड दिवसांच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या तिथं पोहोचले. पण त्यांच्याआधी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ तिथं बसलेलेच होते. किरीट सोमय्यांनी भुजबळांविरूद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपांची मालिकाच सुरू केलीय. ते दोघे आमनेसामने आल्यानं कदाचित तावडेंच्या काळजात धस्स झालं असेल. पण बाप्पानंच सुबुद्धी दिली आणि भुजबळ-सोमय्यांनी चक्क शेकहँड करून एकमेकांची गळाभेट घेतली.

राजकीय विरोधकांना एकमेकांच्या जवळ आणण्याचा हा `चमत्कार` याचि देही, याचि डोळा पाहायला मिळाला.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
Your Comments
Post Comments