गणपती उत्सवासाठी कोकण रेल्वे गाड्यांना जादा डबे, Extra coaches for ganpati festival

गणपती उत्सवासाठी कोकण रेल्वे गाड्यांना जादा डबे

गणपती उत्सवासाठी कोकण रेल्वे गाड्यांना जादा डबे
www.24Taas. झी मीडिया, मुंबई

गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी पाहता कोकण रेल्वेच्या गाड्यांना जादा डबे जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे वेटींगवर असणाऱ्यांना किमान प्रवास करणे शक्य होणार आहे.

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी वाढल्याने काही मिनिटात गांड्यांचे आरक्षण फुल्ल झाले. प्रवाशांची गर्दी पाहून मध्य रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गाड्यांना जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुमारे साडेसात हजार अतिरिक्त प्रवाशांना कोकणात जाणे शक्य होणार आहे. गणेशोत्सवात काळात १२६ जादा गाड्यांशिवाय काही गाड्यांना जादा डबे जोडण्यात येणार आहे.

जादा डबे जोडलेल्या गाड्या

१२१३३-१२१३४ : सीएसटी - मंगलोर एक्स्प्रेस - ५ ते ८ सप्टेंबरपर्यंत एक एसी टू टायर - एसी थ्री टायर डबा. (एक डबा)
१२०५१-१२०५२ : दादर - मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस - ५ ते ११ सप्टेंबरपर्यंत दोन सेकंड क्लासचे डबे. (दोन डब्बे)
०१०३३-०१०३४ : सीएसटी - मडगाव - ७ सप्टेंबर रोजी एक एसी थ्री टायर डबा. (एक डबा)
०१०४१ : सीएसटी - पेरनेम विशेष - या गाडीला ७ सप्टेंबर रोजी एसी थ्री टायर डबा जोडला जाईल(एक डबा)
०१०४२ : पेरनेम विशेष - सीएसटी - या गाडीला ८ सप्टेंबर रोजी एसी थ्री टायर डबा जोडला जाईल(एक डबा)
११००३-११००४ : दादर - सावंतवाडी एक्स्प्रेस - या गाडीला ५ ते २२ सप्टेंबरपर्यंत चार सेकंड क्लासचे डबे (चार डब्बे)


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
Your Comments

krupaya gadyanchi sutnyachi vel dyavi.

  Post CommentsX  
Post Comments