देश विदेशातील बाप्पांच्या मूर्तीचा छंद, of hobby all over country collect the bappa

देश विदेशातील बाप्पांच्या मूर्तीचा छंद

देश विदेशातील बाप्पांच्या मूर्तीचा छंद
www.24taas.com झी मीडिया, अकोला

छंद मनुष्याला पुर्णत्वाकडे घेऊन जातो असे म्हणतात. एका महिलेने श्री गणेशच्या वेगवेगळ्या मूर्तींच्या संग्रहाचा आगळा वेगळा छंद जोपासला आहे. देश विदेशातल्या एक हजार पेक्षा जास्त मूर्ती त्यांच्या संग्रही आहेत.

अकोल्यातील विनूभाई बाविशी या वयाच्या 75 व्या वर्षीही तारुण्यातली तडफ दाखवणा-या या अनोख्या संग्रहाकाची माहिती देत होते.

ऑटोमोबाईल क्षेत्रातलं एक बड प्रस्थ असलेल्या विनूभाईंना कामाच्या निमित्तानं वेगवेगळ्या देशात जावं लागयचं. कामात यश आलं की त्या देशातून गणेशमुर्ती खरेदी करायची, असा त्यांचा छंद होता. १९९३ साली वयाच्या ५६ व्या वर्षी हा आगळा वेगळा छंद त्यांना जडला. स्विडन, थायलंड, सिंगापूर, अमेरिका अशा वेगवेगळ्या देशातल्या मुर्त्यांचा संग्रह त्यांनी जमवाला आहे. वयाच्या ७५ व्या वर्षीही याबाबतचा त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे.

विनूभाईंचा हा छंद जोपासण्यासाठी त्यांच्या घरच्या मंडळींचा ही मोठा वाटा आहे. त्य़ांचे नातेवाईक ही त्यांना गणेशाची मुर्तीच भेट देतात. अशा १५० मुर्तीं त्यांना भेट म्हणून मिळाल्या आहेत.

येत्या काळात ५ हजार गणेशांच्या मुर्त्या जमवाण्याचा संकल्प विनूभाईंनी व्यक्त केला आहे. आयुष्याच्या संध्याकाळी गणेशाचे स्मरण करत त्याच्या वेगवेगळ्या रुपांचा संग्रह करण्याचा त्यांचा हा छंद निश्चितच कौतुकास्पद आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
Your Comments
Post Comments