Last Updated: Friday, September 13, 2013, 00:25
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईगणेशोत्सवानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या परिवारासह झी २४ तासला भेट दिली. झी २४ तासच्या ऑफिसमधल्या गणपतीचं आणि सत्यनारायणाचं त्यांनी दर्शन घेतलं.
त्यानंतर राज यांनी झी २४ तासमधल्या संपादकीयसह सर्व विभागांची माहिती जाणून घेतली. झी २४ तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी राज आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्व विभागांची सविस्तर माहिती दिली.
राज ठाकरेंसोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, सासूबाईही उपस्थित होत्या.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.