उद्धव ठाकरे परदेशात, राज ठाकरे `शिवसेना भवना`त!, Raj Thackeray in Sena Bhavan!

उद्धव ठाकरे परदेशात, राज ठाकरे `शिवसेना भवना`त!

उद्धव ठाकरे परदेशात, राज ठाकरे `शिवसेना भवना`त!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या परदेशात आहेत... हाच मौका साधून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चक्क शिवसेना भवनाचा दौरा केला... राज ठाकरेंच्या या शिवसेना भवनाच्या दौ-याचा हा स्पेशल रिपोर्ट...

दादरच्या शिवसेना भवनासमोर अचानक करड्या रंगाची मर्सिडीज येऊन उभी राहिली... आतून राज ठाकरे खाली उतरले... आणि एकच धावपळ सुरू झाली... राज ठाकरे शिवसेना भवनावर धडकल्याचे वृत्त दादर परिसरात वा-यासारखं पसरलं... पत्नी शर्मिला ठाकरे या देखील त्यांच्यासोबत होत्या... नव्या शिवसेना भवनाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे शिवसेना भवन पाहत होते... शिवसेना भवनात बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो पाहताना राज ठाकरे जुन्या आठवणींमध्ये रमून गेले... बाळासाहेबांच्या फोटोंकडे पाहत त्यांनी पत्नी शर्मिला यांना काही जुने संदर्भही सांगितले... तब्बल 15 मिनिटे राज आणि शर्मिला ठाकरे यांनी शिवसेना भवनाचा फेरफटका मारला.... विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या परदेशात आहेत. बहुतेक हीच संधी साधून राज ठाकरे शिवसेना भवनात गेले असावेत, अशी अटकळ बांधायला सुरूवात झाली...

पण हे शिवसेना भवन म्हणजे शिवसेनेचे खरेखुरे मुख्यालय नव्हे. तर दादरच्याच सेना भवनापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या राम मारूती गणेशोत्सव मंडळाने साकारलेला हुबेहुब देखावा होता. शिवसेना भवनाची ही सेम टू सेम प्रतिकृती पाहून राज ठाकरेंचा चेहराही खुलला होता... मायकल जॅक्सनसोबतचा बाळासाहेबांचा फोटो इथं का नाही, अशी विचारणाही त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना केली....

शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर राजकीय मर्यादांमुळे राज ठाकरेंना शिवसेना भवनात जाता येत नाही... त्यामुळंच की काय प्रति शिवसेना भवनात जाऊन त्यांनी आपली हौस भागवून घेतली... आता केवळ लांबूनच आपल्या विठ्ठलाचे दर्शन न घेता, राज ठाकरे यांनी शिवसेना भवनाचा उंबरठा देखील ओलांडावा, अशी तळमळ कदाचित जुन्या शिवसैनिकांना लागली असावी...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
Your Comments

विठ्ठला ला वाटते की माझा तुका माझ्या मदिंरात परत यावा आसेच मराठी वारकरी संप्रादयाला वाटते व या मदिंरा चा परत १दा झेंडा हातात घेऊन विठ्ठला ची वारी करावी काही चुकल्या स माफी आसवी जय हिंद जय महाराष्ट्र ....... गणेश रणमाळे शिर्डी

  Post CommentsX  

ja yala pahije. karan tich pandhri ani tech vitthal

  Post CommentsX  

निखळ विठ्ठल प्रेमी

  Post CommentsX  

yatun raj yache balasahebavaril peamchi oad desun yete

  Post CommentsX  

`raj thakare` yanna khare `shivsena bhawan` pahaanyache kadhi `aamantran` milel,yacha nem nahi,ase disate.

  Post CommentsX  

aaj khoop garaj ahe raj ani udhao tumi akatra ya

  Post CommentsX  

i like z24 tas

  Post CommentsX  

shevati ti raj sahebanchi ichha....

  Post CommentsX  

yala khar prem mantat .... raj saheb .......

  Post CommentsX  

khup divsani chan news ekli. jay maharastra

  Post CommentsX  

raj sahebani kharch sena bhavnakasudda bhet dyayla havi... ulat shivsainikanna dekhil aanad hoil... mothya sahebanchi univ kharch bhasate aahe............ raj saheb yanna jay maharashtra........

  Post CommentsX  

kahihi aso uddhav saheb yenarya nivadnukit bhagwa zenda fadakwtil.. sobat yal tar swagatch..

  Post CommentsX  

जर बाळासाहेब ह्याच्या बद्दल खरच एवढा आदर असेल तर त्यानी महा युतीत जाव आणि बाळासाहेब याची जी इच्छा शीवशाहीच सरकार परत याव ते पुनॅ होईल

  Post CommentsX  

raj la shivseneshivay paryaych nahi he tyane swatach dakhvun dile are shevti shivsena hi shivsena aahe chateri pateri nahi shivsenesathi shivsainikanni rakt sandlay nustya bajaar gappa marlya nahit aamhi shivsainik original ahot aani he lok duplicate aahet............................

  Post CommentsX  

आता केवळ लांबूनच आपल्या विठ्ठलाचे दर्शन न घेता, राज ठाकरे यांनी शिवसेना भवनाचा उंबरठादेखील ओलांडावा...

  Post CommentsX  

chagali news

  Post CommentsX  

yatun raj yache balasahebavaril peamchi oad desun yete

  Post CommentsX  

khup chan batmi ekayla milali....

  Post CommentsX  

rajna zali balasahebanchi aathva n

  Post CommentsX  

maharashatra ochya vikasa sathi yana ekatra yawe lagelach

  Post CommentsX  

changli news ahe maharastrasathi.

  Post CommentsX  

शिवसेनेला राजच्या नेतृत्ववाची उणीव आहे दोघांनी महाराष्ट्रासाठी एकत्र यावे

  Post CommentsX  

jar raj yanchi shivsena bhavanat yenyachi iccha jari asli tari donhi bajuche nete , kiva kaahi hitshatru te hou denaar naahit. manat vish kalavne chaluch thevtil.

  Post CommentsX  

sarv mangal manglye....

  Post CommentsX  

हे होणारच आहे.

  Post CommentsX  

हे होणारच आहे.

  Post CommentsX  

jay maharastra.

  Post CommentsX  

आता केवळ लांबूनच आपल्या विठ्ठलाचे दर्शन न घेता, राज ठाकरे यांनी शिवसेना भवनाचा उंबरठादेखील ओलांडावा...

  Post CommentsX  

admin 3g gaurav g g ठाकरे कुटुंबात जन्मल्यामुळे लहानपणापासूनच राज ठाकरे यांना बाळ ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. ते अजूनही बाळ ठाकरे यांना आपले दैवताचे स्थान देतात.

  Post CommentsX  

हे होणारच आहे.

  Post CommentsX  

ho ata raj saheb badal ghadvnarach..........................

  Post CommentsX  

raj la ,maharashtrala shivsenechi garaj ahe . ,fakt maharashtrala navhe tr deshala senechi garaj ahe, . . jay maharashtra

  Post CommentsX  
Post Comments