आरती करुन सलमाननं दिला गणपती बाप्पाला निरोप! Salman Khan said Ganpati Bappa Morya

आरती करुन सलमाननं दिला गणपती बाप्पाला निरोप!

आरती करुन सलमाननं दिला गणपती बाप्पाला निरोप!
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडचा दबंग खाननं यंदा आपल्या घरच्या गणपतीचा आनंद बहिणीकडे साजरा केला. सलमानकडील गणपती यंदा त्याची बहिण अलवीराच्या घरी विराजमान झाला होता. आपल्या संपूर्ण कुटुंबासह सलमान खाननं बाप्पाची मनोभावे आरती करुन दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला.

सलमानसोबत त्याचा बॉडीगार्ड शेरा सुद्धा उपस्थित होता. सलमान दरवर्षी आपल्या घरी गणपती आणतो. पण यंदा त्याच्या घरी सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळं गणपती बहिणीच्या घरी मांडला. दीड दिवस आनंदोत्सव साजरा करुन गणपतीचं विसर्जन धूमधडक्यात करण्यात आलं.

बाप्पाच्या विसर्जनसाठी सलमान सहकुटुंब उपस्थित होता. तर अभिनेत्री शिल्पा शेट्टीनंही मिरवणुकीत डांस करुन बाप्पाला निरोप दिला. तर सलमानची पूर्ण प्रेयसी कतरिना कैफ आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांनीही सलमान खानकडील बाप्पाचं दर्शन घेतलं. सलमान सोबत अभिनेता हृतिक रोशननंही दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन केलं. यावेळी त्याच्या वडील राकेश रोशनही उपस्थित होते.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ


Your Comments

nice salman khan said ganpati bappa-morya

  Post CommentsX  
Post Comments