अजित पवार यांचा विजयकुमार गावितांना इशारा

अजित पवार यांचा विजयकुमार गावितांना इशारा

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अजित पवार यांनी शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांना इशारा दिला आहे.

विजयकुमार गावित यांची मुलगी हिना गावित यांना भाजपकडून तिकीट देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

विजयकुमार गावित यांच्या मुलीने भाजपकडून निवडणूक लढवल्यास विजयकुमार गावित यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, असा इशारा आज अजित पवार यांनी दिला आहे.

मात्र विजयकुमार गावित आपल्यावर ही वेळ येऊ देणार नाहीत, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

मीडियात मागील काही दिवसांपासून डॉ. विजयकुमार गावित यांची मुलगी हिना गावित भाजपच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची बातमी येत आहे.

या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार माणिकराव गावित आहेत. माणिकराव गावित आतापर्यंत पराभूत झालेले नाहीत. संसदेतील ज्येष्ठ सदस्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.

First Published: Monday, March 17, 2014, 19:37
First Published: Monday, March 17, 2014, 19:37
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?