Last Updated: Tuesday, March 6, 2012, 13:12
ठाण्यात आज महापौरपदाची निवडणूक होत आहे. यातच अपहरणानाट्यामुळं गाजलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बंडखोर आणि मनसेच्या भूमिकेकडं लक्ष लागले असताना भाजप नगसेविकेच्या अपहरणनाट्याची घटना ताजी असताना काँग्रेसच्या नगरसेविका बेपत्ता झाल्याने राजकारण तापले आहे. दरम्यान, ठाण्यातील काँग्रेसचे नगरसेवक राजन किणे यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.