औरंगाबादमध्ये राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता

औरंगाबादमध्ये राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद

औरंगाबादच्या शांतीगिरी महाराजांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार नसल्याचं जाहीर केलंय. त्यामुळं औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.

२००९च्या निवडणुकीत शांतीगिरी महाराजांनी अपक्ष निवडणूक लढवत तब्बल दीड लाखांच्या आसपास मतं घेतली होती. त्यामुळं शांतीगिरी महाराज यंदा निवडणूक लढवत नसले तरी ते आपलं वजन कुणा-या पारड्यात टाकणार याकडे लक्ष लागलंय.

सर्वच पक्षांचे इच्छूक उमेदवार शांतीगिरी महाराजांच्या आशीर्वादासाठी धावाधाव करत आहेत. याचसंदर्भात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी थेट शांतीगिरी महाराजांशी केलेली चर्चा.

तर दुसरीकडे शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनी शांतीगिरी महाराजांचा आपल्यालाच पाठिंबा असल्याचा दावा केलाय. यासंदर्भात २४ मार्चला शांतीगिरी महाराजांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.

First Published: Tuesday, March 18, 2014, 16:51
First Published: Tuesday, March 18, 2014, 16:51
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?