भाजपचा प्रादेशिक पक्ष पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू

भाजपचा प्रादेशिक पक्ष पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला इतर पक्षांची गरज लागणार नाही असे काही एक्झिट पोल जरी सांगत असले तरी भाजपने मात्र प्रादेशिक पक्षांसाठी दरवाजे खुले ठेवले आहेत. बिजू जनता दल, तेलंगना राष्ट्र समिती आणि वायएसआर काँग्रेस या पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.

हे प्रादेशिक पक्ष एनडीएला अधिक मजबूत करतील अस मत भाजपचे नेते व्यक्त करत आहेत. दरम्यान वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगमोहन रेड्डी आणि भाजपचा मित्रपक्ष तेलगू देसम पार्टीचे ए. चंद्राबाबू नायडू यांचे सीमांध्रावरुन चांगले संबंध नाहीत. मात्र जगमोहन यांचे काँग्रेसशी असलेल्या खराब संबंधाचा फायदा उठवत त्यांना आपल्या गोटात ओढून काँग्रेसला एकाकी पाडण्याची रणनितीही यामागे आहेच.

जगमोहन रेड्डी यांनी एनडीएचा घटक बनण्याचे संकेतही दिले आहेत. तर टीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर यांच्याशीही भाजपने एप्रिलच्या अखेरीस बातचीत केली असून त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशिल आहे. तर बिजू जनता दल पुन्हा एनडीएचा घटक बनण्याची शक्यता आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 13, 2014, 10:44
First Published: Tuesday, May 13, 2014, 11:07
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?