भाजपचा प्रादेशिक पक्ष पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 11:07

सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला इतर पक्षांची गरज लागणार नाही, असे काही एक्झिट पोल जरी सांगत असले तरी भाजपने मात्र प्रादेशिक पक्षांसाठी दरवाजे खुले ठेवले आहेत. बिजू जनता दल, तेलंगना राष्ट्र समिती आणि वायएसआर काँग्रेस या पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.

भुजबळांना धक्का; सिन्नरच्या `वाघा`चा महायुतीला पाठिंबा

Last Updated: Friday, April 11, 2014, 10:46

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांना महिनाभरात  तिसरा धक्का बसलाय. काँग्रेसचे सिन्नर पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब वाघ यांनी महायुतीच्या उमेदवारांला पाठिंबा दिलाय.

बलात्कार करणाऱ्याला फाशी कशाला द्यायला हवी- मुलायम

Last Updated: Friday, April 11, 2014, 08:52

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी अकलेचे तारे तोडलेत. बलात्कार झाल्यावर फाशी कशाला द्यायला हवी, तरुणांकडून चुका होतात, असं संतापजनक वक्तव्य मुलायम सिंहांनी केलंय.

बॉलिवूड आणि सेलिब्रेटींमध्येही मोदी फिवर!

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 11:51

गुजरातमध्ये निवडणूक प्रचार चांगलाच रंगणार असल्याचं दिसतंय. कारण बॉलिवूड तारेतारका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींसाठी प्रचार करण्यासाठी सज्ज आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये जवळपास वीस तारेतारकांनी नरेंद्र मोदींची भेट घेतलीय.

अण्णा-ममता दीदी साथ-साथ!

Last Updated: Wednesday, February 19, 2014, 17:26

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय.

`आप`ला समर्थन देण्यावरून काँग्रेसमध्ये फूट - द्विवेदी

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 18:39

दिल्लीत सत्ता स्थापन करण्यासाठी तयारीत असलेल्या ‘आम आदमी पार्टी’ला काँग्रेसकडून दिल्या गेलेल्या पाठिंब्यावर आता पक्षातच फूट पडताना दिसतेय.

‘काँग्रेस’चा हात ‘आम आदमी पक्षा’ला साथ!

Last Updated: Friday, December 13, 2013, 22:02

दिल्लीत काँग्रेसनं आम आदमी पार्टीला पाठिंबा दिलाय. दिल्लीच्या नायब राज्यपालांना याबाबतचं पत्र काँग्रेसनं आज रात्री सादर केलं.

मोदींनी भाजप सोडल्यास समर्थन देणार- अण्णा

Last Updated: Thursday, August 29, 2013, 15:47

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना आपण पाठिंबा देणार असं म्हटलंय. मात्र त्यासाठी मोदींनी भारतीय जनता पक्ष सोडावा असं अण्णा म्हणाले आहेत. अमेरिकी वृत्तपत्र हफिंग्टन पोस्टनं दिलेल्या बातमीनुसार २० ऑगस्टला डेलावरे इथं हिंदू मंदिरद्वारा आयोजित बैठकीत अण्णा बोलत होते.

बेकायदा बांधकामांना राष्ट्रवादीचा आशिर्वाद!

Last Updated: Saturday, August 3, 2013, 16:10

पिंपरी-चिंचवडमध्ये सतत होणारा पाऊस पाहता, शहराला पुराचा धोका आहे. परिस्थिती इतकी गंभीर असताना नदीकाठी सर्रास बांधकामं सुरू आहेत आणि तीही सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशीर्वादानं. उत्तराखंडचं उदाहरण ताजं असताना सत्ताधा-यांनी कुठलाही धडा घेतलेला नाही.

...तर मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा नाही - शिवसेना

Last Updated: Thursday, April 11, 2013, 16:16

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधानपदासाठी कोणाला पाठिंबा द्यायचे हे आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. त्यामुळे मोदींना सेनेचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अखेर मैत्री तुटलीच; ‘डीएमके’च्या तीन मंत्र्यांचे राजीनामे!

Last Updated: Wednesday, March 20, 2013, 13:25

‘डीएमके’चा यूपीएशी अखेर काडीमोड झालाय. डीएमकेच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना भेटून आपल्या मंत्रीपदाचे राजीनामे सोपवलेत तर आणखी दोन मंत्रीही लवकरच राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत.

राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा

Last Updated: Wednesday, February 27, 2013, 15:15

राज ठाकरेंच्या ताफ्यावरील दगडफेक आणि त्यानंतर मनसेनं घेतलेल्या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलाय. राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष विरोधी पक्ष आहे.

बलात्काऱ्यांना पोलिसच घालतायेत पाठिशी- हायकोर्ट

Last Updated: Friday, November 9, 2012, 20:10

बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे पोलिसांचा धाक गुन्हेगारांना राहिलेला आहे की, नाही असाच प्रश्न सामान्यांना पडलेला आहे.

सरकार पडणार वाटतं, घटक पक्ष पाठिंबा काढणार?

Last Updated: Saturday, September 15, 2012, 14:24

इंधन दरवाढ आणि परदेशी गुंतवणुकीबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर, आता युपीए घटक पक्षांमध्ये विरोध वाढीस लागला आहे.

राष्ट्रपती निवडणूक : संगमांना भाजपचा पाठिंबा

Last Updated: Thursday, June 21, 2012, 13:06

राष्ट्रपती निवडणूक पदाची निवडणूक रंगदार होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेले माजी लोकसभा अध्यक्ष पूर्णो संगमा यांना अधिकृतपणे पाठिंबा दिला आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.

भाजपला सेनेचा ठेंगा, मात्र काँग्रेसला पाठिंबा

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 08:25

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा जाहीर केलाय. शिवसेना काय भूमिका घेते याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष होते. रात्री उशिरा शिवसेनाप्रमुखांनी एक निवेदन प्रसिद्ध करुन राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवार म्हणून प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला.

ममता पाठिंबा देतील, प्रणवदा विजयी भव- शरद पवार

Last Updated: Saturday, June 16, 2012, 18:13

राष्ट्रपतींच्या उमेदवाराबाबत ममता बॅनर्जी जास्त टोकाची भुमिका घेणार नाहीत, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यात बोलत होते.

काळापैसा : बाबांना मुलायम पाठिंबा

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 18:17

काळा पैसा देशात आणण्यासाठी योगगुरू रामदेव बाबा यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांचीही त्यांनी भेट घेतली आणि मुलायम यांनी काळ्या पैशाविरोधातल्या आंदोलनाला समर्थन दिल्याची माहिती बाबा रामदेवांनी दिलीय.

पाठिंबा काढणार, सरकार करूणांसमोर वाकणार?

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 12:47

पेट्रोल दरवाढीवरुन केंद्र सरकारवर चोहीबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. विरोधकच नाहीतर युपीएच्या घटक पक्षांनीही सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. डीएमकेचे सर्वेसर्वा करुणानिधी यांनी पेट्रोल दरवाढीवरुन युपीएचा पाठिंबा काढण्याची धमकी दिली आहे.

'भारत बंद'ला सेनेचा पाठिंबा...

Last Updated: Thursday, May 24, 2012, 17:39

३१ मे रोजी एनडीएने पुकारलेल्या भारत बंदला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा राहिल, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय. काल भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केल्याचंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

सचिनने खासदारकीचा मान घ्यावाच- राज

Last Updated: Friday, April 27, 2012, 15:20

सचिनला मिळालेली खासदारकी हा त्यांचा मान आहे. आणि त्याने तो घ्यावा असं रोखठोक मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या पत्रकार परिषदेत मांडलं. सचिन तेंडुलकरला खासदारकी देण्याचा प्रश्नावरून बऱ्याच मोठ्या प्रमाणात राजकिय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत.

मनसेचा आघाडीला 'पाठिंबा', सेनेला मात्र 'ठेंगा'

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 11:38

औरंगाबाद जिल्हा परिषदेतही मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा देणार आहे. एवढच नाही तर आघाडीसोबत सत्तेतही सहभागी होणार आहे. अध्यक्षपद काँग्रेसकडं, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडं तर मनसेला दोन समित्या मिळणार आहेत.

भाजपचा पाठिंबा, नाशकात मनसेचा महापौर

Last Updated: Thursday, March 15, 2012, 11:06

नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक आज होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा देण्याचे निश्चित केले आहे. त्याबाबतची आज घोषणा थोड्याच वेळात करण्यात येणार आहे. या पाठिंब्यामुळे नाशकात मनसेचा पहिला महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मनसेचे महापौरासाठी २ उमेदवार!

Last Updated: Friday, March 9, 2012, 17:44

मनसे महापौरपदासाठी दोन उमेदवार उभे करणार आहे. दगाफटका टाळण्यासाठी मनसेतर्फे शशिकांत जाधव आणि यतीन वाघ महापौरपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. तर उपमहापौरपदासाठी रमेश धोंबडे आणि अशोक मुर्तडक अर्ज दाखल करणार आहेत

मनसेला पाठिंबा देण्याचे भाजपचे संकेत

Last Updated: Friday, March 9, 2012, 19:48

नाशिकमध्ये जनादेशाचा आदर केला जाईल असं सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी मनसेला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. त्यातच शिवसेनेनं महापौरपदासाठी दावा केला आहे. त्यासाठी अपक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. बहुमतासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार अशीची चर्चा आहे.

नाशिक महापौरपदाचा गुंता वाढला

Last Updated: Friday, March 9, 2012, 17:44

नाशिकमध्ये महापौरपदाचा तिढा वाढलाय. शिवसेनेनं महापौरपदासाठी हालचाली सुरू केल्यात. त्यासाठी अपक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. बहुमतासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार अशी चर्चा आहे. तर भाजप मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय.

ठाणे झेडपीतही राज यांचा सेनेला पाठिंबा!

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 19:52

ठाणे महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सेनेला साथ दिल्यानंतर आता ठाणे जिल्हा परिषदेतही हा ठाकरे पॅटर्न दिसणार आहे. या संदर्भातील माहिती मनसेचे आमदार रमेश पाटील यांनी दिली.

ठाकरे बंधू एकत्र आहेत- पिचड

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 08:26

ठाण्याच्या महापौरपदाच्या निवडणुकीतून परत एकदा स्पष्टपणे हे दिसून आलं आहे की दोन्ही ठाकरे बंधु एक आहेत. ठाकरे बंधु लोकांची दिशाभूल करत आहेत आणि हे परत एकदा सिद्ध झालं आहे.

...तर नाशिकमध्ये मनसेला मदत - उद्धव

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 16:54

ठाण्यात सेनेले सत्तास्थापनेसाठी एक पाऊल पुढे टाकणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी आता त्यांचे भाऊ आणखी एक पाऊल पुढे टाकण्यासाठी सरसावले आहेत.

बाळासाहेबांसाठी ठाण्यात राजचे ‘एक पाऊल पुढे’

Last Updated: Tuesday, March 6, 2012, 17:25

ठाण्याच्या जनतेने शिवसेना-भाजप युतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे ठाण्यात विकासाच्या मुद्द्यावर मी शिवसेना भाजप युतीला पाठिंबा देत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट करून एका वेगळ्या समीकरणाची सुरूवात केली आहे. तसेच बाळासाहेबांच्या इच्छेमुळेही मी युतीला पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.