नरेंद्र मोदींच्या रॅलीमध्ये सौम्य लाठीचार्ज

 नरेंद्र मोदींच्या रॅलीमध्ये सौम्य लाठीचार्ज
www.zee24taas.com, झी मीडिया, गया

बिहार पोलिसांनी आज गया इथं जमावाला नियंत्रित करण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची गया इथं सभा होती. मोदींचं भाषण सुरू होण्यापूर्वी हा गोंधळ गांधी मैदानावर सुरू झाला.

नरेंद्र मोदी चॉपरनं सभेच्या ठिकाणी पोहोचताच जमावानं त्यांना भेटण्यासाठी बेरिगेट्स तोडले आणि रेस्ट्रिक्टेड जागी येण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं पोलिसांना हा सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

जमावातील काहींनी आपले बुटं फेकले, खुर्च्या पोलिसांवर फेकण्याचा प्रयत्न केला. नंतर भाजपचे बिहारचे नेते सुशील कुमार मोदी यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती केली.

निवडणूक प्रचारांमध्ये आणि नरेंद्र मोदींवरील दहशतवादी हल्ल्याच्या भीतीनं सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. नुकतंच दोन आत्मघाती दहशतवाद्यांना दिल्ली एटीएसनं अटक केलीय. त्यामुळं मोदी आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा वाढवण्यात आलीय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 27, 2014, 17:30
First Published: Thursday, March 27, 2014, 17:30
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?