भुजबळांना धक्का; सिन्नरच्या 'वाघा'चा महायुतीला पाठिंबा

भुजबळांना धक्का; सिन्नरच्या `वाघा`चा महायुतीला पाठिंबा

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांना महिनाभरात  तिसरा धक्का बसलाय. काँग्रेसचे सिन्नर पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब वाघ यांनी महायुतीच्या उमेदवारांला पाठिंबा दिलाय.

गेल्या पाच वर्षांपासून नाशिक जिल्ह्यावर एक हाती वर्चस्व असणाऱ्या भुजबळांना आता स्वकीयांकडूनच विरोध होतोय. सगळ्यात आधी बंडाचं निशाण फडकावलं ते काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि नुकताच नगरसेवकपदाचा राजीनामा देणाऱ्या दिनकर पाटील यांनी... भुजबळांवर टीकेची झोड उठवत त्यांनी बसपाकडून निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली तर महापालिका निवडणुकीतल्या पराभवापासून घुसमटत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षांनी समर्थकांचा  मेळावा घेऊन जाहीर नाराजी व्यक्त केलीय. या दोघांनंतर काँग्रेसचे सिन्नर पंचायत समितीचे सभापती बाळासहेब वाघ यांनी उघडउघड बंडाचं निशाण फडकावलंय आणि भुजबळांच्या विरोधात हेमंत गोडसे यांचा प्रचार करण्याचा निर्धार व्यक्त केलाय.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मात्र असल्या धमक्यांचा  फरक पडत नाही, असा दावा राष्ट्रवादी काँगेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार यांनी केलाय.

गेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार समीर भुजबळ यांना सिन्नर तालुक्यातून सर्वात जास्त ४९ हजार २९ मतं मिळाली होती. शिवसेनेचे दत्ता गायकवाड ३५ हजार २१९ तर हेमंत गोडसे यांच्या पारड्यात २५ हजार ७२४ मत पडली होती. यंदाच्या निवडणुकीत गोडसे शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत असल्यानं सभापतींच्या बंडाळीचा किती फायदा त्यांना मिळतो हे बघणं जितकं उत्सुकतेचं आहे. तितकच नाराजांची दूर करण्यात राष्ट्रवादीचे  उमेदवार आणि पदाधिकारी किती यशस्वी होतात, यावरही मतांचं गणित अवलंबून राहणार आहे.





इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 11, 2014, 10:46
First Published: Friday, April 11, 2014, 10:46
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?