राणेंना राष्ट्रवादीची ठसन कायम, प्रचारास नकार

राणेंना राष्ट्रवादीची ठसन कायम, प्रचारास नकार
www.24taas.com, झी मीडिया, सिंधुदुर्ग

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेली ठसन अजूनही कायम आहे. सिंधुदुर्गात नीलेश राणे यांना मदत करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा नकार कायम आहे.

राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांची आणि पदाधिका-यांची समजूत काढण्यासाठी आज पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड सिंधुदुर्गात गेले होते. मात्र त्यांची शिष्टाईही असफल झालीय.

राणेंना मदत न करण्याच्या मुद्द्यावर अजूनही सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे. आता उद्या संध्याकाळी चार वाजता दीपक केसरकर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

केसरकरांच्या नाराजीचा राणेंना फटका?
- दीपक केसरकर सावंतवाडीचे
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार

- 2009 मध्ये केसरकरांच्या
मतदारसंघात राणेंना

- 2009 विधानसभा निवडणुकीत
केसरकरांना मिळाली

- सावंतवाडीसोबत कुडाळ आणि
कणकवलीतही केसरकरांचा प्रभाव

- राष्ट्रवादीच्या नाराजीचा
निलेश राणेंना बसू शकतो फटका

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ

First Published: Thursday, April 10, 2014, 17:04
First Published: Thursday, April 10, 2014, 23:48
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?