Last Updated: Wednesday, May 21, 2014, 17:55
केंद्रातील माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यूपीएकडून नरेंद्र मोदींशी संपर्क साधणारा मी एकमेव आहे, असा दावा केला आहे. तसेच मोदींशी माझे जवळचे संबंध असल्याचे ही पवारांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार हे लोकसभा निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पक्ष कार्यालयात आले होते. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळेही होत्या. या वेळी पत्रकार परीषदेत बोलताना, पवार यांनी मोदींच्या कामांचे कौतुक केले.