राणेंच्या इशाऱ्यानंतर दीपक केसरकरांच्या सुरक्षेत वाढ

राणेंच्या इशाऱ्यानंतर दीपक केसरकरांच्या सुरक्षेत वाढ
www.24taas.com, झी मीडिया, सिंधुदुर्ग

रत्नागिरी-सिंधुदुर्गात दीपक केसरकर-नारायण राणे वादानंतर केसरकरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. रेल्वे सुरक्षा बलातील आठ रायफलधारी पोलीस केसरकरांसाठी तैनात करण्यात आलेत.

काल दीपक केसरकरांनी सावंतवाडीमध्ये पदाधिका-यांच्या बैठकीमध्ये नारायण राणेंवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलीय. तर दुसरीकडे आज नारायण राणेंची सावंतवाडीच्या गांधी चौकामध्ये सभा होतेय. ज्या ठिकाणी केसरकरांनी सभा घेतली त्याच बाजूला राणेंची तोफ धडाडणार आहे. त्याआधी केसरकरांची राजकीय अस्तित्व संपुष्टात आणीन, असा दावा राणे यांनी केला आहे.

दीपक केसरकरांनी नारायण राणेंची गणना नरकासुराशी केली होती. आज प्रचाराची शेवटची सभा असल्यानं या सभेत राणे काय बोलणार याकडे सा-यांचच लक्ष असणार आहे. 17 तारखेला मतदान होणार आहे. आणि आज संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 15, 2014, 12:28
First Published: Tuesday, April 15, 2014, 13:38
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?