शिवसेनेची समजूत काढण्यासाठी भाजपची धावाधाव

शिवसेनेची समजूत काढण्यासाठी भाजपची धावाधाव
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

भाजप आणि मनसेतल्या वाढत्या जवळीकीमुळं नाराज झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपची धावाधाव सुरू झालीयं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहेत.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. शिवसेना भाजपचा विश्वासू सहकारी असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर ट्विटरवरून व्यक्त केलीय. तर दुसरीकडे शिवसेनेची बैठक ही केवळ जागांच्या मोर्चेबांधणीसाठी असून शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद नाहीत.

युतीसंदर्भात भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रुडींनी उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात युती अभेद्य असल्याचा दावा केलाय. तसंच उद्धव ठाकरेंची ते प्रत्यक्ष भेट घेणारेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 11, 2014, 12:56
First Published: Tuesday, March 11, 2014, 13:27
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?