महायुतीतील नेत्यांशी चर्चा करुनच मुख्यमंत्री ठरणार - उद्धव

Last Updated: Thursday, June 19, 2014, 20:03

शिवसेनेचा आज वर्धापन दिन कार्य़क्रम झाला. यानिमित्त दोन दिवसीय शिबीराचं आयोजन केलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिबीरामध्ये मांडलेलं व्हिजन सांगितलं. महायुतीचं सरकार आल्यावर मुंबईसाठी काय करणार याबद्दल उद्धव ठाकरेंनी माहिती दिली.

पंकजा मुंडे भाजपच्या कोअर कमिटीत येणार- फडणवीस

Last Updated: Thursday, June 19, 2014, 17:55

मुंबईत भाजपच्या राज्यातल्या कोअर कमिटीची बैठक झाली. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक पार पडली. पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांनी सांगितलंय.

मुंडेंच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा- देवेंद्र फडणवीस

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 11:25

गोपीनाथ मुंडे अपघात प्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. नितीन गडकरी यांच्यासोबत त्यांनी राजनाथ सिंहांची भेट घेतली. राजनाथ सिंहांसह सकारात्मक चर्चा झाली असून अधिकृत घोषणा गृहमंत्री करतील असं फडणवीसांनी सांगितलंय.

दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र; भाजपचा जोर

Last Updated: Tuesday, May 27, 2014, 18:21

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठी आता केवळ पाच महिने उरले असताना राज्यात महायुती कुणाच्या नेतृत्त्वाखाली निवडणुका लढवणार? असा प्रश्न निर्माण झालाय.

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसच भाजपचे नेते - मुंडे

Last Updated: Sunday, March 16, 2014, 19:34

भाजपमधील सुंदोपसुंदी आता नेत्यांकडून व्यक्त होत असतांना दिसून येत आहे.

शिवसेनेची समजूत काढण्यासाठी भाजपची धावाधाव

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 13:27

भाजप आणि मनसेतल्या वाढत्या जवळीकीमुळं नाराज झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपची धावाधाव सुरू झालीयं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहेत.

तर मग तेव्हा बाळासाहेबांना का सोडून गेले?

Last Updated: Monday, February 3, 2014, 18:10

भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना कडक शब्दात उत्तर दिलं आहे.

काही नवरे बाशिंग बांधून थकले!- फडणवीसांचा पवारांवर पलटवार

Last Updated: Sunday, September 22, 2013, 12:14

`काही नवरे बाशिंग बांधून थकलेत`, असा पलटवार करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या शरद पवारांना चोख प्रत्युत्तर दिलंय.

राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचं आव्हान

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 15:46

मनसे प्रमुख राज ठाकरेंना भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान दिलं आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस

Last Updated: Thursday, April 11, 2013, 13:11

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजपच्या प्रदेशाध्यक्षाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली आहे. कालच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली.

भाजप प्रदेशाध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 21:10

भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय येत्या दोन दिवसांत होणार सल्याची माहिती, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी ही माहिती दिली आहे.