www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुख्य यादीत नाव नसलेल्यांना मतदान करता येणार नाही, असं मुंबई उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी स्पष्ट केलंय.
मुख्य यादीत नाव नसलेल्यांनाही आयडी दाखवून मतदान करता येईल, असा निर्णय आयोगानं घेतल्याची माहिती भाजपच्या लिगल सेलचे प्रमुख अॅड.विनोद तिवारी यांनी दिली होती. मात्र ही माहिती चुकीची असल्याचा खुलासा चन्ने यांनी केलाय.
ज्यांचं नाव मतदार यादीत आहे, अशांनाच केवळ मतदान करता येईल. ज्यांची नावं वगळली आहे, त्यांना निवडणुकीनंतर अर्ज भरून आपलं नाव पुन्हा यादीत टाकता येईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.
जाणून घ्या काय म्हणाले जिल्हाधिकारी, पाहा व्हिडिओ•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 23, 2014, 18:52