मतदार यादीत नाव नाही, मतदान करताच येणार नाही

Last Updated: Wednesday, April 23, 2014, 18:54

मुख्य यादीत नाव नसलेल्यांना मतदान करता येणार नाही, असं मुंबई उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी स्पष्ट केलंय.

मतदार राजा, अफवांवर विश्वास ठेवू नकोस

Last Updated: Wednesday, April 23, 2014, 11:19

मुंबई, ठाण्यात गुरुवारी लोकसभा निवडणूक २०१४ साठी मतदान होतंय. पण, याआधीच आपली नावं मतदार यादीत आहेत की नाहीत याबद्दल नागरिकांनी आत्ताच खात्री करून घेण्याचं आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केलंय.

ऑफिसमधून पाहा, तुमचं नाव मतदार यादीत आहे?

Last Updated: Monday, April 21, 2014, 11:31

मुंबईकरांनो मतदार यादीत तुमचं नाव आहे का? हे तुम्हाला ऑफिसमधून बसूनच पाहता येणार आहे. मतदार यादीत तुमचं नाव आहे किंवा नाही, याची खातरजमा करणे महत्वाचे आहे.

पुण्यात दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकाऱ्यांना घेराव, नाशिकमध्येही घोळ

Last Updated: Friday, April 18, 2014, 17:52

पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी 58 टक्के मतदान झालं असलं तरी मतदार यादीत घोळ झाल्यानं अनेक पुणेकरांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. पुण्यातल्या मतदार यादीत प्रचंड घोळ असल्याचा मतदारांचा आरोप आहे. जे नागरिक मतदान करू शकले नाहीत त्यांना मतदान करण्याचा अधिकार द्या, अशी मागणी भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी केलीय. दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी घेराव घातला. तर नाशिकमध्येही घोळ झाल्याचे दिसत आहे.

घोळ: अमोल पालेकर, सलील कुलकर्णी मतदानापासून वंचित

Last Updated: Thursday, April 17, 2014, 13:00

पुण्यामध्ये शिवाजी नगर भागात मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं समोर आलंय. हजारो मतदारांची मतदान यादीत नावंच नाहीयेत. यात अनेक सेलिब्रेटी मतदारांचाही समावेश आहे. मतदार यादीतील घोळामुळं अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर, गायक-संगीतकार सलील कुलकर्णी, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, संध्या गोखले यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागतंय.

अबब! 46 हजार मतदारांची नावं मतदान यादीतून गायब

Last Updated: Thursday, April 10, 2014, 19:33

अमरावती लोकसभा मतदारसंघातील एका परिसरातील सुमारे 46 हजार लोकांची नावं मतदार यादीतून गायब असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार अभिजित अडसूळ यांनी केला आहे. त्यामुळं अमरावती तहसील कार्यालयात गोंधळाची स्थिती आहे. एकाच भागातील समुारे 46 हजार मतदारांची नावं अचानक गायब होणं यामागे काही तरी राजकीय षडयंत्र आहे का याची चर्चा सुरु झाली आहे.

मतदार यादीत `किन्नर` समाजाचं अस्तित्त्व!

Last Updated: Thursday, February 20, 2014, 18:21

किन्नर समाजाला आता त्यांची स्वतःची ओळख मिळाली आहे. मतदार यादीमध्ये प्रथमच स्त्री किंवा पुरुष नाही तर ` किन्नर` या नावाने त्यांची वेगळी नोंद करण्यात आली आहे. यामुळे किन्नर समाजात आनंदाचे वातावरण पसरलंय.

मुंबईत नाही छत्तीसगडमध्ये राहते ऐश्वर्या राय-बच्चन!

Last Updated: Monday, December 30, 2013, 10:01

ऐश्वर्या राय-बच्चन ही मुंबईत नाही तर छत्तीसगडमध्ये राहतेय... आणि सध्या ऐश्वर्याचं वय आहे केवळ २३ वर्ष... तुम्ही म्हणाल, भलतंच काय? पण, हे आम्ही नाही तर मतदार यादी सांगतेय.

तुम्हीच करा, मतदार यादी अद्यावत!

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 11:08

तुमचे मतदार यादीत नाव नाही. किंवा नाव नोंदवूनही तुमचे मतदान कार्ड मिळाले नसेल तर घाबरून जाऊ नका. तुम्हीच तुमची माहिती आता मतदार यादीत समाविष्ट किंवा अद्यावत करू शकता. तेही घरबसल्या.

`मतदार यादीतून ८५ टक्के मराठी नावं गायब`

Last Updated: Saturday, March 9, 2013, 14:05

मुंबईच्या मतदारयादीत गोंधळ असल्याचा आरोप, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त ते षण्मुखानंद सभागृहात बोलत होते.

आपलं नाव मतदार यादीत आहे का?

Last Updated: Wednesday, February 15, 2012, 15:06

आपलं नाव शोधण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी आवश्यक असलेल्या काही गाईडलाईन्स खास आपल्यासाठी. मतदारांना गाईडलाईनचा फायदा मतदार यादीमध्ये नाव शोधण्यासाठी नक्कीच होईल. जाणून घ्या मतदानासाठीची गाईडलाईन्स.