धक्काबुक्की पाहून नगमानं रोड शो अर्धवट सोडला

धक्काबुक्की पाहून नगमानं रोड शो अर्धवट सोडला
www.24taas.com, झी मीडिया, मेरठ

काँग्रेसची मेरठची उमेदवार अभिनेत्री नगमा हिला बघण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये धक्काबुक्की झाल्यानं नगमाला रोड शो अर्धवट सोडावा लागला. शनिवारी हा सगळा प्रकार घडला. जेव्हा नगमा प्रचारासाठी रोड शो करायला भटीपुरा आणि हसनपूर भागांत पोहोचली.

अभिनेत्री नगमा आपल्या प्रचारासाठी रोड शो करत किठोर या परिसरात पोहोचली. तेव्हा तिनं आपल्या भाषणात आपला लढा हा नरेंद्र मोदी आणि सांप्रदायिक शक्तींविरोधात असल्याचं ती म्हणाली. याचदरम्यान नगमाला बघण्यासाठी लोकांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. हे सर्व बघून नगमा शाहजहांपूरकडे जाण्याऐवजी किठोरहूनच मेरठला परतली.

यापूर्वी शुक्रवारी रात्री परिक्षितगढच्या सौंदत्त गावातील बिजनोर लोकसभा जागेवरून यूपीएची उमेदवार अभिनेत्री जयाप्रदा सुद्धा अशाचप्रकारे रोड शोमधूनच परतल्या. जयाप्रदा यांच्या रोड शो दरम्यान गोंधळ झाला होता.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 30, 2014, 12:29
First Published: Sunday, March 30, 2014, 12:29
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?