पद्मसिंह पाटलांच्या ताफ्याखाली चिरडून मुलीचा मृत्यू

पद्मसिंह पाटलांच्या ताफ्याखाली चिरडून मुलीचा मृत्यू
www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर

लोकसभा निवडणुकीच्या आधीच एका निष्पाप आणि कोवळ्या जीवाला आपल्या प्राणास मुकावं लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांचा प्रचार सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडलीय.

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील एक आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूरचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांचा प्रचार दौरा सुरू होता. यावेळी त्यांच्या दिमतीला त्यांचा ताफाही मोठ्या प्रमाणावर होता.

हा प्रचार ताफा बार्शी तालुक्यातील पानगाव-कोरफळे रस्त्यावर पोहचला असताना पद्मसिंह पाटील यांच्या ताफ्यातील एका गाडीनं दोन लहान मुलींना उडवलं. या धडकेत पाच वर्षांच्या एका मुलीचा जागीच मृत्यू झाला तर तिची लहान बहिण गंभीररित्या जखमी झालीय.

अपघात झाल्यानंतर वाहन चालकाने तिथून पळ काढण्यात यशस्वी झाला. मात्र, नागरिकांनी गाडीत बसलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला पकडून यथेच्छ चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. जखमी मुलीला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 8, 2014, 16:55
First Published: Tuesday, April 8, 2014, 18:09
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?