Last Updated: Wednesday, December 11, 2013, 14:02
बेदरकारपणे एस टी चालवून ९ जणांचे बळी घेणाऱ्या चालक संतोष माने याला दिलेली फाशीची शिक्षा कायम करण्यात आली आहे. संतोषची फाशीची शिक्षा आज पुणे सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आली. खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, चोरी आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या गुन्ह्यांत त्याला आरोपी ठरविण्यात आले आहे.