कोणाला स्वत:च मुख्यमंत्री व्हायचंय, उद्धव ठाकरेंचा राजना टोला

कोणाला स्वत:च मुख्यमंत्री व्हायचंय, उद्धव ठाकरेंचा राजना टोला
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

“मला कार्यकर्ते आग्रह करतायत पण मी अजून त्याबाबत विचार केलेलाच नाही”, हे वक्तव्य केलं उद्धव ठाकरे यांनी. शिवाय कुणाला स्व:तच मुख्यमंत्री व्हायचंय, असं म्हणत त्यांना राज ठाकरेंना टोला हाणायची संधीही सोडली नाही.

अवजड उद्योग मंत्री अनंत गितेंच्या पदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणं झाल्याचं उद्धव यांनी म्हटलंय. शिवसेनेला जनतेशी संपर्क असणारं खातं हवं होतं. पण शिवसेनेच्या पदरात अवजड उद्योग मंत्री पद आलं. मात्र चर्चेनुसार फेरबदलादरम्यान शिवसेनेला जनतेशी संपर्क साधता येईल, असं खातं मिळेल असंही उद्धव म्हणाले.

उद्धव आणि राज ठाकरेंमधलं वाकयुद्ध सर्वांनाच माहिती आहे. निवडणुकीदरम्यान, एका मुलाखतीत बोलतांना राज ठाकरेंनी आपण संधी आणि बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्री होणार असं सांगितलं होतं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री व्हावे, अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे. त्यावर उद्धव ठाकरेंनी आज ही प्रतिक्रिया दिलीय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 29, 2014, 17:22
First Published: Thursday, May 29, 2014, 17:22
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?