डॉ. मनमोहन सिंग यांचे मंत्रिमंडळातल्या सदस्यांसाठी चहापान

डॉ. मनमोहन सिंग यांचे मंत्रिमंडळातल्या सदस्यांसाठी चहापान
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर आल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या कर्मचा-यांचा निरोप घेतला. शनिवारी पंतप्रधान मंत्रिमंडळातल्या सर्व सदस्यांसाठी चहापान आयोजित करणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयातल्या पंतप्रधानांच्या पर्सनल स्टाफची संख्या 110 इतकी आहे. तर कार्यालयातले इतर कर्मचारी मिळून एकूण 400 कर्माचीरी इथे आहेत. साऊथ ब्लॉकमध्ये असलेल्या या कार्यालयात पंतप्रधानांनी स्वतः प्रत्येकाची भेट घेऊन प्रत्येकाला निरोप दिला.

शनिवारी पंतप्रधान मंत्रिमंडळातल्या सर्व सदस्यांसाठी चहापान आयोजित करणार आहेत. त्यानंतर या सर्वांसाठी राष्ट्रपती रात्री भोजनाचे आयोजन करणार आहेत. नव्या पंतप्रधानांच्या स्वागतासाठी पंतप्रधान कार्यालयाचे सुशोभीकरण केले जात आहे.




* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 14, 2014, 09:35
First Published: Wednesday, May 14, 2014, 09:46
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?