लता मंगेशकर, बिग बीचा काँग्रेसकडून अपमान - मोदी

लता मंगेशकर, बिग बीचा काँग्रेसकडून अपमान - मोदी
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल-प्रियांका गांधी यांच्यात सध्या `ऊँच-नीच`च्या राजकारणाचा खेळ रंगलाय. राजकारणाच्या या आखाड्यात आता चक्क गानसम्राज्ञी `भारतरत्न` लता मंगेशकर आणि बॉलिवूडचा महानायक `बिग बी` अमिताभ बच्चन यांना देखील ओढण्यात आलंय.

कलाक्षेत्रातील उत्तुंग शिखरावरच्या या ता-यांचा काँग्रेसकडून कसा अपमान करण्यात आला, याची उदाहरणंच नरेंद्र मोदींनी आज गाझीपूरमधील सभेत दिली. तर दुसरीकडे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मोदींनी जातीपातीचा मुद्दा उपस्थित केला खरा. मात्र आता त्यांच्याच जातीवरून वाद निर्माण झालाय.

काँग्रेसनं ते ओबीसी नसल्याचा दावा केलाय. तर काँग्रेसच्या काळातच मोदींच्या जातीचा ओबीसीत समावेश झाल्याचा प्रतिदावा भाजपनं केलाय. मात्र यानिमित्तानं जातीच्या राजकारणाचा पुन्हा प्रत्यय आलाय. मोदींनी हे वक्तव्य केलं आणि विकासाच्या मुद्यावर सुरू झालेली ही निवडणूक मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात जातीच्या मुद्यावर येवून थांबली.

प्रियांका गांधींनी खालच्या पातळीच्या राजकारणाचा आरोप मोदींवर केला खरा, मात्र युपी आणि बिहारला डोळ्यासमोर ठेवून मोदींनी या वक्तव्याचा खुबीनं वापर केला. मोदींनी खालच्या पातळीच्या राजकारणाला खालच्या जातीचा रंग दिला आणि काँग्रेसची चांगलीच अड़चण झाली. मात्र आता मोदींच्या ओबीसी असण्यावरच आता बसपापाठोपाठ काँग्रेसनंही आक्षेप घेतलाय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 9, 2014, 21:46
First Published: Saturday, May 10, 2014, 09:07
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?