Last Updated: Wednesday, August 8, 2012, 21:34
हिंदी चित्रपटसृष्टीतील बडे स्टार चुकतात आणि त्यांच्या चुका त्यांचे चाहते काढतात. अशीच घटना घडली आहे, तीही लंडन ऑलिम्पिकच्या निमित्ताने. चुकले कोण, असा प्रश्न पडला ना. बिग बी अमिताभ बच्चन आणि स्टार शाहीद कपूर. बिग बीन मेरी कोमला आसामची करून टाकली तर शाहीदने मेरीचे कॉम केले. त्यामुळे हे दोघे ‘ट्विटर'वर चुकांमध्ये हीट झाले.