लोकसभा निवडणूक : शेवटच्या टप्प्यातल्या तोफा थंड

लोकसभा निवडणूक : शेवटच्या टप्प्यातल्या तोफा थंड
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातल्या तोफा आता थोड्याच वेळात थंडावणार आहेत. या टप्प्यात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढमधल्या ४१ जागांसाठी मतदान होणार आहे. मात्र सर्वाधिक लक्ष लागलंय ते वाराणसीतल्या लढतीकडे.

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अजय राय आणि आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांच्यात ही लढत होत आहे. या लढतीसाठी तीनही पक्षांनी प्रचंड शक्ती पणाला लावलीय. त्यामुळे नवव्या टप्प्याचं केंद्रस्थान हे वाराणसी राहिलंय. वाराणसीजवळ रोहीनियामध्ये झालेली नरेंद्र मोदींची सभा, त्याआधी वारणसीत झालेलं आंदोलनाचं रणकंदन आणि त्यानंतर भाजपने वाराणसीत केलेलं शक्तीप्रदर्शन यातून भाजपला जे साध्य करायचं होतं ते करता आलं.

याला काल आम आदमी पार्टीनेही भव्य रोड शो करत तोडीस तोड उत्तर दिलंय. त्यानंतर आज राहुल गांधींनीही जोरदार रॅली काढत शक्तीप्रदर्शनातून प्रत्युत्तर दिलंय. तर आज दुपारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 10, 2014, 17:28
First Published: Saturday, May 10, 2014, 17:28
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?