WWW.24TAAS.COM, झी मीडिया, नवी दिल्लीलोकसभा निवडणूकीची उमेदवारी दाखल करण्याची वेळ आली आहे. अनेक उमेदवारांची संपत्ती कोट्यवधींच्या घरात आहे.
मात्र केरळमधील एका उमेदवाराची संपत्ती अवघी 750 रूपये आहे. कोट्टायममधून बीजू नावाचे उमेदवार, सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडियाकडून निवडणूक लढवत आहेत.
बीजू यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे की, आपल्याकडे रोख ५०० रूपये आहेत. एका बँक खात्यात २५० रूपये आहेत.
तसेच आपल्या पत्नीकडे कोणतीही संपत्ती, वाहन नाही. केरळमधील २० जागांसाठी उमेदवारी दाखल करण्यास शनिवारपासून सुरूवात झाली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.
First Published: Monday, March 17, 2014, 23:33