कोण आहेत मालमत्ता जाहीर न करणारे मंत्री?

Last Updated: Tuesday, June 17, 2014, 19:19

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीन-तीनदा आदेश देऊनही, आघाडी सरकारमधील 42 पैकी 18 मंत्र्यांनी अजून आपली मालमत्ता जाहीर केलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला या मंत्र्यांनी चक्क केराची टोपली दाखवलीय. आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांचं किती वजन आहे, हेच यावरून स्पष्ट दिसतंय...

मोदींच्या मंत्र्यांना द्यावी लागणार संपत्तीची माहिती

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 22:55

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना त्यांच्या संपत्तीची माहिती, 15 दिवसांच्या आत सादर करावी लागणार आहे.

मायकल जॅक्सनच्या मुलांना मिळणार वार्षिक खर्च

Last Updated: Friday, May 9, 2014, 10:25

पॉप संगिताचा बादशाह स्वर्गीय मायकल जॅक्सन याच्या प्रिन्स, पॅरिस आणि ब्लॅन्केट या तिन्ही मुलांना वार्षिक खर्च म्हणून ८ दशलक्ष यूएस डॉलर्स देण्याचं मंजूर करण्यात आलंय.

नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत झाली वाढ

Last Updated: Friday, April 25, 2014, 12:26

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची संपत्ती पंधरवाड्यात 14 लाखांनी वाढली आहे. बडोदा, वाराणसीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा आवढलेला आकडा दिसून आलाय.

केंद्रीय मंत्र्यांच्या संपत्तीत रेकॉर्डब्रेक वाढ

Last Updated: Thursday, April 10, 2014, 18:43

पाच वर्षाचा काळ हा एखाद्या सामान्य व्यक्तीसाठी संपत्ती वाढवण्यासाठी काही विशेष नसतो. पण आपल्या नेतेमंडळीं आणि मंत्र्यांसाठी हाच काळ चांगला असू शकतो.

पाहा नरेंद्र मोदींची संपत्ती किती?

Last Updated: Thursday, April 10, 2014, 11:48

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याकडे दीड कोटी रूपयांची संपत्ती आहे. वडोदऱ्यावरून उमेदवारी अर्ज भरतांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मोदींनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे.

९ करोडपैंकी सोनियांनी राहुलला दिलं ९ लाखांचं कर्ज

Last Updated: Wednesday, April 2, 2014, 20:16

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी आपली संपत्ती जाहीर केलीय. आपल्याकडे एकूण ९ करोड २८ लाख ९५ हजार रुपये असल्याचं सोनियांनी जाहीर केलंय.

शशि थरुर यांची संपत्ती... फक्त २३ करोड!

Last Updated: Wednesday, March 19, 2014, 10:09

केंद्रीय मंत्री शशि थरुर यांनी आपली संपत्ती जवळजवळ २३ करोड रुपये असल्याचं घोषित केलंय.

उमेदवाराची संपत्ती अवघे ७५० रूपये

Last Updated: Monday, March 17, 2014, 23:33

लोकसभा निवडणूकीची उमेदवारी दाखल करण्याची वेळ आली आहे. अनेक उमेदवारांची संपत्ती कोट्यवधींच्या घरात आहे.

पवारांची संपत्ती ५ वर्षात ४ पट वाढली

Last Updated: Friday, January 24, 2014, 21:40

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या संपत्तीत ५ वर्षात एक नाही, दोन नाही, तर चार पटींनी वाढ झाली आहे. शरद पवारांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल केला. अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावर पवारांच्या संपत्तीत झालेली वाढ दिसून आली.

उद्धव - जयदेवमधला गैरसमज दूर करणार, चंदूमामांचा पण!

Last Updated: Thursday, January 23, 2014, 10:25

ठाकरे घराण्यातला संपत्तीचा वाद चव्हाट्यावर आल्यानंतर याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे... यातच, एकेवेळी `आपण राज आणि उद्धवला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करू` असं म्हणणाऱ्या चंदूमामांनी आता `आपण उद्धव आणि जयदेव यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करू` असं म्हटलंय.

जगातील निम्मी संपत्ती ८५ अतिश्रीमंत व्यक्तींकडे

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 08:16

जगातील एकूण संपत्तीपैकी निम्मी संपत्ती जगातील ८५ अतिश्रीमंत व्यक्तींकडे आहे. हा दावा केलाय वर्ल्डवाईड डेव्हलेपमेंट ऑर्गनायझेशन ऑक्सफामनं.

काँग्रेस नेत्याने नोकराला दिली ६०० कोटींची संपत्ती

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 19:41

करा सेवा, मिळणार मेवा अशा म्हणीचा प्रत्यय गुजरातमध्ये पाहायला मिळाला आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने आपली ६०० कोटींची मालमत्ता आपल्या नोकराच्या नावावर केली आहे.

‘ह्युफिग्टंन पोस्ट’ची माघार... सोनियांचं नाव हटवलं

Last Updated: Tuesday, December 3, 2013, 15:48

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या बहुआकडी संपत्तीवरून वाद सुरू झालाय. दरम्यान, हे संपत्तीचे आकडे उघड करणाऱ्या ‘हफिंग्टन पोस्ट’ या अमेरिकन वेबसाइटनं या वादातून काढता पाय घेत सोनिया गांधींचं ‘डिलीट’ मारलंय. ‘हफिंग्टन पोस्ट’नं जाहीर केलेल्या श्रीमंत २० नेत्यांच्या यादीत आता मात्र सोनिया गांधींचं नाव दिसत नाही.

बुंदेलखंडमध्ये सापडली ४००० कोटींची संपत्ती!

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 12:10

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये साधूच्या स्वप्नातील सोनं पुरातत्त्व विभागाला सापडो अथवा न सापडो, मात्र बुंदेलखंडमधील ४००० कोटींच्या खजिन्याचा शोध भूगर्भ शास्त्रज्ञांनी लावला आहे.

अबब...अमेरिकेला विकत घेण्याइतकी पेशव्यांकडे संपत्ती

Last Updated: Saturday, October 26, 2013, 14:09

सध्या उन्नावमध्ये खजिन्याचा शोध सुरू आहे. मात्र या खजिन्यात कुणाची संपत्ती आहे य़ाबाबत जोरदार वादविवाद सुरू आहेत. हा खजिना नानासाहेब पेशव्यांचा असल्याचा दावा अनेक इतिहासतज्ञ करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पेशव्यांच्या खजिन्याच्या तपशीलाचा शोध लागलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

मुंबईच्या पहिल्या डॉनच्या कुटुंबातच `वॉर`

Last Updated: Sunday, August 18, 2013, 21:48

मुंबई अंडरवर्ल्डमधील सर्वात पहिला डॉन हाजी मस्तानच्या घरात वारसा हक्कावरून कलह सुरू झालाय. हाजी मस्तानची मुलगी शमशादच्या विरोधात पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

घटस्फोट : पत्नीला पतीच्या `वडिलोपार्जित` संपत्तीतही वाटा!

Last Updated: Thursday, July 18, 2013, 09:15

लग्न आणि घटस्फोटासंदर्भातले कायदे विशेषतः महिलांच्या दृष्टीनं सुटसुटीत होणार आहेत. घटस्फोट घेताना पतीच्या वडिलोपार्जित संपत्तीतही पत्नीला वाटा मिळू शकेल.

मुंडे अडचणीत, आयकर खात्याची नोटीस

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 21:24

गेल्या लोकसभा निवडणुकीत आठ कोटी रुपये खर्च केल्याचे प्रकरण भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपीनाथ मुंडे यांना आता आणखी अडचणीत टाकण्याची शक्यता आहे. मुंडे यांना निवडणूक आयोगापाठोपाठ आयकर विभागानेही नोटीस पाठवली आहे.

गोनीने रचला आईला घराबाहेर काढण्याचा डाव

Last Updated: Saturday, June 29, 2013, 17:07

भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मनप्रीत सिंह गोनी यांच्यावर त्याच्याच आईने गंभीर आरोप लावला आहे. मनप्रीत गोनी आपला भाऊ,वहिनी आणि पत्नीसह मिळून आपली संपत्ती हडपण्याचा आणि आपल्याला घरातून हलकण्याचा डाव आखत असल्याचा आरोप त्याची ७० वर्षीय आई मोहिंदर कौर यांनी लावला आहे.

बांग्लादेशात हिंदूंसाठी नवा कायदा!

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 16:01

बांग्लादेश कॅबिनेटनं हिंदू धार्मिक संपत्तीचा विकास तसंच या संपत्तीचा बेकायदेशीर गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी एका नव्या कायद्याला मान्यता दिलीय. कॅबिनेटनं या कायद्याच्या अंतिम मसुद्याला मान्यता दिलीय.

धनसंपत्ती वृद्धीसाठी करा हे उपाय

Last Updated: Saturday, June 8, 2013, 08:42

धनसंपत्ती वृद्धीसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. पुढील काही गोष्टी लक्षात घेतल्यास याचा नक्कीच फायदा होईल.

१३ फ्लॅटसचा कर चुकवणारे शेलार अडचणीत!

Last Updated: Wednesday, June 5, 2013, 10:45

पुणे मनपाचे उपायुक्त रमेश शेलार यांना मिळकत कर चुकवल्याप्रकरणी तीन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेत.

मंत्र्यांना संपत्ती जाहीर करायला `प्रॉब्लेम` का?

Last Updated: Saturday, June 1, 2013, 08:19

मंत्र्यांची मालमत्ता नेहमीच चर्चेचा विषय असतो. जनतेलाही ती जाणून घेण्यात विशेष रस असतो. त्यामुळं बिहार सरकारनं आपल्या सर्व मंत्र्यांची मालमत्ता थेट वेबसाईटवर जाहीर केलीय.

महेशकुमारच्या अड्ड्यातून करोडोंची बेनामी संपत्ती जप्त

Last Updated: Wednesday, May 8, 2013, 08:32

रेल्वेत पदोन्नती मिळावी यासाठी ९० लाख रुपये लाच देणाऱ्या पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक महेश कुमार प्रकरणात सीबीआयनं पुन्हा एकदा धाड सत्र सुरु केलंय.

फेंगशुईनुसार चिनी नाण्याने मिळते धनसंपत्ती

Last Updated: Saturday, April 27, 2013, 07:48

आपण ‍तीन चिनी नाणी लाल रंगाच्या धाग्याने किंवा फितीने बांधू शकता आणि ती आपल्या पैशांच्या पाकिटात किंवा बटव्यात ठेवू शकता.

कारकुनाकडे ४० कोटींचा खजिना!

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 08:55

एका कारकूनाकडे पैशाचं घबाड सापडलंय. हा कारकून आहे मध्यप्रदेशातील. त्याच्याकडे सापडली आहे, एक कोटी, दोन कोटी, दहा कोटी नाही तर तब्बल ४० कोटी रूपयांची संपत्ती.

धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी वापरा हे श्रीयंत्र

Last Updated: Thursday, December 6, 2012, 07:22

धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी श्रीयंत्र, महालक्ष्मी, लक्ष्मीगणेश, श्रीसुक्त यंत्र तसेच दुष्ट शक्तींपासून संरक्षण होण्यासाठी महामृत्युंजय यंत्र, रामरक्षा यंत्र, दत्तात्रय यंत्र या यंत्रांची विधीवत पूजा केल्यास त्याचे निश्चित असे फळ मिळते.

संपत्तीची प्राप्ती वाढवण्यासाठी...

Last Updated: Wednesday, September 5, 2012, 15:29

आपल्या घरात सदैव सुख-समृद्धी असावी असं आपल्याला वाटत असतं. यासाठी घरातील आवक वाढावी, धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी, असं आपल्याला नेहमी वाटतं. धर्मशास्त्रात यासाठी एक सोपा उपाय सांगितलेला आहे.

'काका'च्या संपत्तीतून डिंपल बेदखल

Last Updated: Sunday, July 29, 2012, 13:36

बॉलिवूडचा एकमेव ‘सुपरस्टार’ अशी उपाधी मिळवलेल्या राजेश खन्ना यांनी १८ जुलै रोजी या जगाचा निरोप घेतलाय. त्यांच्या मृत्यूनंतर अनिता अडवाणी हीनं राजेश खन्ना यांच्या ‘आशिर्वाद’ बंगल्यावर हक्क दाखवला आणि काकांच्या मृत्यूनंतर संपत्तीवाद चव्हाट्यावर आला. आता या वादात आणि भर पडलीय. कारण, राजेश खन्ना यांनी बनवलेल्या मृत्यूपत्रात त्यांची पूर्व पत्नी डिंपल कपाडिया हिला संपत्तीतून बेदखल केलंय.

कुणाच्या कुंडलीत असतो श्रीमंतीचा योग?

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 22:12

आपलं स्वतःचं घर असावं, प्रॉपर्टी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपण त्यासाठी प्रयत्नही करत असतो. तरीही बऱ्याचवेळा या गोष्टी प्राप्त करण्यात यश लाभत नाही. तर इतरांना मात्र सहज बंगला, गाडी मिळवणं जमतं.

झटपट श्रीमंत होण्याचा मंत्र

Last Updated: Sunday, June 17, 2012, 21:51

काही शास्त्रांमध्ये धनप्राप्तीचे वेगवेगळे मंत्र आणि तोडगे सांगितले आहेत. यातील काही मंत्र अत्यंत प्रभावशाली आहेत. या मंत्रांनी चमत्कार घडतो. लवकरात लवकर हातात संपत्ती येते.

बाबांची कृपा : ड्रायव्हरच्या नावे १२००० कोटी

Last Updated: Thursday, May 31, 2012, 18:19

बाबा जय गुरूदेव यांना मुखाग्नि देणाऱ्या पंकज यादव या वाहनचालकास 12 हजार कोटी रुपये संपत्ती असलेल्या ट्रस्टचा विश्वस्त नेमलं आहे. पंकजला आपला उत्तराधिकारी बनवण्याचा निर्णय स्वतः बाबा जयगुरूदेव यांनी आधीच घेतला होता.

निवृत्त पोलीस भाऊसाहेब आंधळकरांना अटक

Last Updated: Thursday, May 3, 2012, 09:04

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी पुण्यात भाऊसाहेब आंधळकर यांना अटक करण्यात आली आहे. आंधळकर निवृत्त पोलीस निरीक्षक आहेत. ज्ञात स्त्रोतापेक्षा जास्त संपत्ती असल्याच्या कारणावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

घटस्फोट झाला सोपा, संपत्तीत पत्नीला अर्धा वाटा

Last Updated: Saturday, March 24, 2012, 08:11

हिंदू विवाह कायद्यात बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे विवाहबंधन कायम राहण्याच्या सर्व शक्यता संपुष्टात येणे हे घटस्फोटासाठीचे नवे कारण कायद्यात समाविष्ट करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी मान्यता दिली. यामुळे घटस्फोटाची प्रक्रिया सुलभ होणार आहे. या प्रक्रियेमुळे घटस्फोट घेणे सोपे झाले आहे. नव्या कायद्यामुळे आता पत्नीला पतीच्या संपत्तीतील अर्धा वाटा द्यावा लागणार आहे. तसेच दत्तक मुलालाही आता हक्क प्राप्त होणार आहे.

सोनिया गांधींची संपत्ती किती?

Last Updated: Saturday, February 25, 2012, 17:01

लोकसभा निवडणुकीच्या अर्जासोबत सोनियांनी आपल्याकडे १ कोटी ३८ लाख रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. ही आकडेबारी २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील आहे.