मुख्यमंत्री अपघातात थोडक्यात बचावले

मुख्यमंत्री अपघातात थोडक्यात बचावले
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एका अपघातात थोडक्यात बचावले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्याला मालाडला शनिवारी रात्री अपघात झाला.

या अपघातात मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. अपघातातून मुख्यमंत्री आणि त्यांच्या चालक बचावला आहे.

चालक किरकोळ जखमी झाला आहे. त्याला नजीकच्या सूचक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री पश्‍चिम उपनगरात गेले होते. त्यावेळी मालाड व कांदिवलीमधील एका सिग्नलजवळ मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाने दुसर्‍या एका वाहनाला धडक दिली.

या धडकेत मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा मागोमाग धडकला. तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यात मुख्यमंत्र्यांच्या पायलट कारचा चालक जखमी झाला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 20, 2014, 10:59
First Published: Sunday, April 20, 2014, 13:05
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?