माजी मुख्यमंत्री मायावती थोडक्यात बचावल्या

माजी मुख्यमंत्री मायावती थोडक्यात बचावल्या
www.24taas.com, झी मीडिया, लखनौ

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती थोडक्यात बचावल्या आहेत, लखनौत विमान उतरविण्यात येत होते, यावेळी तांत्रिक बिघाड झाला मात्र सुदैवाने अपघात टळला.

महाराष्ट्रातील प्रचार दौरा आटोपून बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती रविवारीमाघारी परतल्या.

मात्र लखनौ विमानतळावर हे भाडोत्री विमान उतरविण्यात येत असतांना, धावपट्टीजवळ आल्यानंतर विमानाचं पुढचं चाक अडकलं.

मात्र वैमानिकाने प्रसंगावधान राखले आणि चाकांचे साह्य न घेता `बेली लँडिंग`प्रमाणे प्रयत्न करणे भाग पडले, आणि यात वैमानिक अखेर यशस्वी ठरला.

वैमानिकाने तात्काळ बिघाडाबाबत हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला कळवले, यानंतर ताबडतोब अग्निशामक, सुरक्षा रक्षक आणि रुग्णवाहिका धावपट्टीपाशी दाखल झाले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, April 14, 2014, 18:25
First Published: Monday, April 14, 2014, 21:03
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?