केजरीवालांची मीडियाला पहिले धमकी, आता घुमजाव!

केजरीवालांची मीडियाला पहिले धमकी, आता घुमजाव!
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

आपचं सरकार आल्यास मीडियाला जेलमध्ये टाकणार अशी धमकी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मीडियाला धमकी दिलीय. नागपूरमध्ये काल `डिनर विथ केजरीवाल` कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. १० हजार रुपये घेऊन हा उपक्रम पक्षानं राबवला होता. त्याच कार्यक्रमात केजरीवाल यांनी ही धमकी दिलीय.

मात्र काल धमकी देणारे केजरीवाल यांनी आज मात्र घुमजाव केलंय. त्यांनी मीडियाशी कुठल्याही प्रकारची नाराजी नसल्याचं म्हटलंय. आपण असं काहीच म्हटलंच नसल्याचं आज त्यांनी म्हटलंय.

पैसे घेऊन नरेंद्र मोदींना पाठिंबा देणाऱ्या मीडियाला, सत्तेवर आल्यास जेलमध्ये टाकणार असल्याची धमकी केजरीवालांनी दिली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी माध्यमांवर काही गंभीर आरोपही केले आहेत

एकूणच आपचे नेते अरविंद केजरीवाल यांची भाषा दिवसेंदिवस जहाल होत चालल्याचं दिसून येतंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, March 14, 2014, 11:13
First Published: Friday, March 14, 2014, 11:43
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?