Last Updated: Wednesday, December 25, 2013, 12:16
दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करण्यापूर्वीच ‘आम आदमी पार्टी’मध्ये विद्रोहाचा सूर उमटला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर विधानसभेवरून निवडून आलेले आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी मंत्रिपद न मिळाल्यानं पक्षाशी विद्रोह करण्याच्या तयारीत होते. मात्र, मी नाराज नसल्याचे स्पष्ट करत बिन्नी यांनी पलटी मारली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पदाचे दावेदार अरविंद केजरीवाल यांनी त्यांची नाराजी दूर केल्याचे सांगण्यात येत आहे.