मोंदीकडे 500 कुर्ते, रोज बदलतात पाच - मुलायमसिंग

मोंदीकडे 500 कुर्ते, रोज बदलतात पाच - मुलायमसिंग
www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ

भाजपचे नरेंद्र मोदी कपडे बदलण्यात जास्त वेळ घालवत आहेत. मोदींकडे 500 कुर्ते आहेत. ते रोज पाचवेळा बदलत असतात. मोदी हे नौटंकी करत आहेत. त्यांची ही नौटंकी मुलायम संपवून टाकतील, असे विधान समाजवादी पक्षाचे खासदार मुलायमसिंग यादव यांनी आझमगड येथे केले. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ही तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली.

वाराणसीमध्ये भाजपचा एक चहावाला निवडणूक लढवित आहे. मात्र, आमचा एक पानवाला त्याला टक्कर देईल. पान खाण्यातून व्हिटॅमिन सी मिळते. तर चहा हे आपले आरोग्य बिघडवते. मोदी यांचे हवा हवाई मॉ़डेल आहे. मोदी हे खोटे आणि फ्रॉ़ड नेता आहेत. मी आतापर्यंत एवढा खोटा नेता पाहिलेला नाही, असा हल्लाबोल मुलायम यांनी जाहीर सभेत केला.

समाजवादीच्या विकासापुढे भाजपचा दावा खोटा आहे. गुजरातच्या विकासाचा मुद्दा खोटा आहे. लोकांसमोर खोटा प्रचार केला जात आहे. गुजरातमधील शेतकरी हतबल आहे. तिथे अन्न आणि विज महाग मिळत आहे. परंतु उत्तर प्रदेशातील शेतकरी सधन आहे. मोदी सरकारच्या राजवटीत अन्नावाचून 7,000 लोक मेलेत. देशात जास्तीत जास्त उद्योगपती गुजरात राज्यात आहेत. त्यांच्याच पैशावर मोदी राजकीय निवडणूक लढवित आहेत, अशी जोरदार टीका मुलायम यांनी मोदींवर केली.

मोदींना मुलायम यांनी काही प्रश्न विचारलेत. मोदी माझ्या सारखं करुन दाखवतील काय, गुजरातमध्ये मोफत शिक्षण देऊ शकतील काय, गुजरातमधील जनतेला मोफत आरोग्य सेवा देतील का? याबाबत ते काहीही करू शकणार नाही, असे मत मुलायम यांनी व्यक्त केले.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 23, 2014, 08:40
First Published: Wednesday, April 23, 2014, 08:41
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?