Last Updated: Wednesday, April 23, 2014, 08:41
भाजपचे नरेंद्र मोदी कपडे बदलण्यात जास्त वेळ घालवत आहेत. मोदींकडे 500 कुर्ते आहेत. ते रोज पाचवेळा बदलत असतात. मोदी हे नौटंकी करत आहेत. त्यांची ही नौटंकी मुलायम संपवून टाकतील, असे विधान समाजवादी पक्षाचे खासदार मुलायमसिंग यादव यांनी आझमगड येथे केले. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ही तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली.