मोदी गुजरातमध्ये बोलणार, महाराष्ट्रात थ्रीडी सभा!

मोदी गुजरातमध्ये बोलणार, महाराष्ट्रात थ्रीडी सभा!

www.zee24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद

लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसं तसे राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करण्यावर जोर देत आहेत. सध्या नेत्याचं प्रचार करण्याचं माध्यम सोशल मीडिया आहे आणि म्हणूनच की काय, या सोशल मीडियाचा वाढता वापर लक्षात घेऊन भाजपने एक आगळीवेगळी संकल्पना आणली आहे, ती म्हणजे थ्रीडी.

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची थ्रीडी सभा आयोजित करण्यात आली आहे. या थ्रीडी सभेची खासियत म्हणजे एकाचवेळी ही सभा संपूर्ण देशात थ्रीडीच्या माध्यमातून दिसणार आहे. याआधी जगात प्रथमच थ्रीडी तंत्रज्ञान वापर करुन निवडणूक प्रचार करण्याचा विक्रम मोदींनी विधानसभा निवडणुकीत केला होता. आगामी निवडणुकीसाठीही अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

मोदींची थ्रीडी सभा देशात ४०० ठिकाणी दिसणार आहे. तर महाराष्ट्रात नाशिकतील दिंडोरी मतदारसंघ मनमाड येथे प्रक्षेपण होईल आणि काही ठिकाणी प्रक्षेपण दिसेल. ही सभा १४ ते १६ एप्रिल या दरम्यान असेल. नरेंद्र मोदी गुजराततून भाषण करतील. त्यावेळी मोदींना स्क्रीनवर जवळपास १० हजार जनता बघू शकेल असी सोय करण्यात येणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 3, 2014, 16:25
First Published: Thursday, April 3, 2014, 16:25
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?