Last Updated: Thursday, April 3, 2014, 16:25
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची थ्रीडी सभा आयोजित करण्यात आली आहे. या थ्रीडी सभेची खासियत म्हणजे एकाचवेळी ही सभा संपूर्ण देशात थ्रीडीच्या माध्यमातून दिसणार आहे. याआधी जगात प्रथमच थ्रीडी तंत्रज्ञान वापर करुन निवडणूक प्रचार करण्याचा विक्रम मोदींनी विधानसभा निवडणुकीत केला होता. आगामी निवडणुकीसाठीही अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.