खुनाचा आरोप असणारे डॉ.पद्मसिंग पाटील बाहेर कसे - उद्धव

खुनाचा आरोप असणारे डॉ.पद्मसिंग पाटील बाहेर कसे - उद्धव
www.24taas.com, झी मीडिया, उस्मानाबाद

भ्रष्टाचाराचे आरोप असणारे शिवसेनेचे सुरेश जैन तुरुंगात तर खुनासारखा गंभीर आरोप असणारे राष्ट्रवादीचे डॉ.पद्मसिंह पाटील बाहेर कसे, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना केलाय. हे काँग्रेस आघाडीचे कटकारस्थान आहे, असा आरोप उद्धव यांनी केला आहे.

यावेळी उद्धव यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा चांगला समाचार घेतला. राष्ट्रवादीतील खुनाच्या आरोपाखाली असणारे बाहेर पडतातच कसे आणि त्यांना निवडणूक रिंगणात उतरविले जाते कसे, हा सर्व पवारांच्यामुळे होत आहे. तसंच बोटावरची शाई पुसून डबल मतदान करण्याच्या शरद पवारांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला.

आमचे सुरेशदादा जैन आजारी असताना तुरुंगात खितपत पडले आहेत. त्यांना मुद्दाम डांबून ठेवण्यात आले आहे. मात्र, गंभीर आरोप असणारे तुरुंगाबाहेर येतात कसे, ही सर्व काँग्रेसची खेळी आहे. असा आरोप उद्धव यांनी काँग्रेसवर केला. ते लोकसभा मतदारसंघातले शिवसेनेचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या प्रचारासाठी उस्मानाबाद आले असताना ते बोलत होते.

पाहा व्हिडिओ


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 9, 2014, 20:44
First Published: Wednesday, April 9, 2014, 20:47
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?