मोदींनी शपथ घेताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू!

मोदींनी शपथ घेताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू!
www.24taas.com, झी मीडिया, वडनगर/गुजरात

नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबा यांनीही वडनगरमध्ये घरात बसून नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पाहिला. हिराबा यांच्यासोबत मोदींचे सर्व कुटुंबियही उपस्थित होते. मोदींचे भाऊ पंकज यांच्या डोळ्यात याक्षणी आनंदाश्रू तरळले.

सध्या हिराबा नरेंद्र मोदींचे छोटे भाऊ पंकज मोदी यांच्या घरी राहातात. तिथं त्यांनी हा शपथविधी सोहळा पाहिला. हा आनंदाचा क्षण अनुभवताना आईच्या डोळ्यातही आनंदाश्रू होते. तर पूर्ण कुटुंबाचे डोळेही पाणावले होते.
यापूर्वी मोदी गुजरात सोडून दिल्लीकडे रवाना झाले, तेव्हाही हिराबा भारावल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मोदींना आशिर्वादरूपी एकशे एक रुपये दिले होते. मोदी प्रत्येक वेळी आपल्या आईची भेट घेवून त्यांचे आशिर्वाद घेतात.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 26, 2014, 22:48
First Published: Monday, May 26, 2014, 22:48
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?