मोदींनी शपथ घेताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू!

Last Updated: Monday, May 26, 2014, 22:48

नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबा यांनीही वडनगरमध्ये घरात बसून नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पाहिला. हिराबा यांच्यासोबत मोदींचे सर्व कुटुंबियही उपस्थित होते. मोदींचे भाऊ पंकज यांच्या डोळ्यात याक्षणी आनंदाश्रू तरळले.

एका व्यक्तीसाठी स्वतंत्र मतदान केंद्र

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 10:51

गुजरातमधील गिर अभयारण्यात केवळ एका मतदारासाठी उभारण्यात येणार असलेले स्वतंत्र मतदान केंद्र आयोगाच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचा एक उत्तम नमुना आहे. आशियायी सिंहांचा रहिवास असलेल्या गिरच्या अभयारण्यातील बनेज पाड्यावर राहणारे महंत भारतदास दर्शनदास यांच्यासाठी हे स्वतंत्र मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर 7 जणांचा होरपळून मृत्यू

Last Updated: Saturday, March 22, 2014, 20:58

मुंबई-अहमदाबाद हायवेवर टँकर पलटल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अपघातानंतर टँकरनं अचानक पेट घेतला. आणि यामध्ये सात जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर 8 जण जखमी झाले आहेत.

अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील वर्सोवा ब्रिज वाहतूक दोन महिने बंद

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 12:31

अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वरील फाउनटन हॉटेलच्या पुढील जुन्या वर्सोवा ब्रिजला २१ डिसेंबरला तडे गेल्याने या महामार्गावरील गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतुकीची लेन उद्या सकाळपासून दोन महिन्यासाठी बंद करण्यात येणार आहे.

सावधान, लिफ्ट देणं तुमच्या जीवावर बेतू शकत!

Last Updated: Wednesday, December 11, 2013, 09:01

तुम्ही कारने जात आहात अथवा मोटार सायकलने जात असाल तर कोणी लिप्ट मागितली तर ती देऊ नका. तुमची दया तुमच्या जीवावर बेतू शकते. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तसेच नवी मुंबईत असे प्रकार घडले आहेत. बंदुकीचा धाक दाखवून लूटणारी टोळी सक्रीय आहे. अशाच एका टोळीला पोलिसांनी अटक केलेय.

मोदी पंतप्रधान झाले तर आनंदच – अडवाणी

Last Updated: Thursday, October 17, 2013, 07:59

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अखेर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची स्तुती करत मोदी पंतप्रधान झाल्यास आपल्याला आनंदच होईल असं म्हटलंय. मोदींची स्तुती करुन अडवाणींनी आपली नाराजी दूर झाल्याचंच दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय.

फरार नारायण साई नेपाळमध्ये गेल्याची शंका

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 11:31

लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेला आसाराम बापूंचा मुलगा नारायण साई नेपाळमध्ये पळून गेल्याची बातमी आहे. त्याच्याच तपासासाठी सूरत पोलीस बिहारला रवाना झाले आहेत. पोलीस नारायण साईंच्या पासपोर्ट विषयी माहिती घेत आहेत.

पोलिसांना चकवा देऊन ‘आयएम’चा दहशतवादी फरार

Last Updated: Friday, September 20, 2013, 18:35

मुंबई सेशन्स कोर्टात आज एक धक्कादायक घटना घडलीय. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा अफजल उस्मानी हा दहशतवादी फरार झालाय.

अतिरेक्यांनी तरूंगात खोदले भुयार

Last Updated: Monday, February 11, 2013, 15:40

अहमदाबाद येथील साबरमती जेलमध्ये अतिरेक्यांनी भुयार खोदलेय. साबरमती जेलमध्ये अतिरेक्यांनी खोदलेले भुयार १८ फूट लांबीचे आहे. इंडियन मुजाहिद्दीनच्या सात अतिरेक्यांनी हे भुयार खोदल्याचे स्पष्ट करण्यात आलेय.

भारत पाक दुसरी टी-२० स्कोअर

Last Updated: Friday, December 28, 2012, 21:47

पाकिस्‍तानविरुद्ध दुस-या टी-20 लढतीत भारतची प्रथम फलंदाजी आहे. पाकिस्‍तानचा कर्णधार मोहम्मद हाफिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात रविंद्र जडेजाच्‍या जागेवर आर. अश्विनला संधी देण्‍यात आली आहे. तर पाकिस्‍तानने कोणताही बदल केला नाही.

टीम इंडिया विजयी, टेस्टमध्ये १-०ने आघाडी

Last Updated: Monday, November 19, 2012, 13:08

अहमदाबाद टेस्टमध्ये इंग्लंडनं ठेलवलेल्या ७७ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना टीम इंडियानं एका गड्याच्या मोबदल्यात सामना खिशात टाकला. टीम इंडियाने टेस्टमध्ये १-०ने आघाडी घेतली आहे.

कोलावरी डी ते कोला मार्केटिंग

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 09:34

आता कोलावेरी डीचा गायक धनुष वायरल मार्केटिंगचे धडे अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना देणार आहे.