www.24taas.com, झी मीडिया, मुंबईलोकसभेत राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला आहे, यासाठी आज मुंबईत शरद पवारांनी राष्ट्रवादीची चिंतन बैठक बोलावली होती, या बैठकीत शरद पवारांनी नेत्यांना सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यावर मेळावे घ्या, कार्यकर्त्यांच्या समस्या समजून घ्या, जनमानसात उंची वाढवा, अशी सूचना यावेळी शरद पवारांनी दिल्या आहेत.
मी आजही 16 तास काम करू शकतो, यावरून राज्यातील पक्षाची सूत्र हातात घेण्याचे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.
चिंतन बैठकीत आगामी विधानसभेसाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येईल, असंही यावेळी शरद पवारांनी सांगितलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 23, 2014, 16:01