सिंधुदुर्गनंतर रत्नागिरीत राडा, आघाडीच्या बैठकीत कानाखाली

सिंधुदुर्गनंतर रत्नागिरीत राडा, आघाडीच्या बैठकीत कानाखाली
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी

कोकणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये प्रचंड रा़डा सुरू आहे. सिंधुदुर्गमधील वाद क्षमण्याची चिन्हे नसतानाच रत्नागिरीच्या काँग्रेस भवनात जोरदार राडा झाला. आघाडीच्या बैठकीत हा राडा झाल्याने काँग्रेसला लोकसभा निवडणूक जड जाण्याचे संकेत मिळत आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची समन्वयची बैठक सुरू असताना राणे समर्थक पंचायत समिती सदस्य उठला आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्याच्या अंगावर गेला. हे पाहून राष्ट्रवादीचे सदस्य राणे समर्थकाच्या अंगावर धावून गेले. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाद निवळला. मात्र त्याच वेळी काँग्रेसच्या बड्या नेत्याला फोन गेला आणि त्यानं येवून राणे समर्थक असलेल्या पंचायत समिती सदस्याच्याच श्रीमुखात भडकवली. यानंतर प्रचंड हमरीतुमरी झाली.

या राड्यानंतर दोन्ही काँग्रेसमध्ये तणाव वाढला आहे. तर दुसरीकडे नीलेश राणेंचा कुठल्याही परिस्थितीत प्रचार करणार नाही, असा निर्णय सिंधुदुर्गात केसरकर आणि पदाधिका-यांच्या बैठकीत घेण्यात आलाय. उद्या पवारांच्या सभेवरही राष्ट्रवादीचे पदाधिकारी बहिष्कार टाकणार आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, April 12, 2014, 16:45
First Published: Saturday, April 12, 2014, 16:57
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?