ईशान्य मुंबईत राष्ट्रवादीची गोची, मनसे तटस्थ

ईशान्य मुंबईत राष्ट्रवादीची गोची, मनसे तटस्थ
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मतदानाचा दिवस जवळ येत चालला आहे, तसे राजकीय पक्षांकडून मते मिळवण्यासाठी विविध खेळ्या खेळल्या जात आहेत. ईशान्य मुंबईत भाजप उमेदवाराविरोधात मनसेनं उमेदवार न उतरवल्यानं राष्ट्रवादीची अडचण झाली होती. मात्र राष्ट्रवादीनं यातून मार्ग काढत या मतदारसंघात मराठी कार्ड बाहेर काढून प्रचार सुरु केला आहे. यामुळं भाजपची गोची झालीय.

ईशान्य मुंबई मतदारसंघात सुमारे 16 लाख 40 हजार मतदारांची संख्या आहे. यामध्ये निम्म्याहून अधिक म्हणजे 50 टक्क्यांहून अधिक मतदार मराठी आहेत. 12 टक्के गुजराती मतदार, 12 टक्के उत्तर भारतीय मतदार, 15 टक्के मुस्लिम मतदार आहेत. मनसेचा उमेदवार नसल्यामुळं भाजपला फायदा होईल. असं दिसत असलं तरी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दीना पाटील यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मराठी कार्ड बाहेर काढले आहे.

मराठी मतांवर हक्क सांगण्यासाठी मनसेचा उमेदवार नसल्याचा फायदा उचलत राष्ट्रवादीनं किमान इथं तरी मनसेचा मराठीचा मुद्दा हायजॅक केल्याचं दिसंत.महापालिका निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेना-भाजपचे 14 तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे 9 नगरसेवक निवडून आलेत. महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजपकडं 25 हजारांचे मताधिक्य आहे. तसंच मनसेचे तीन आमदार आणि 8 नगरसेवक भाजपच्या मदतीला धावून येतील. अशी भाजपला आशा आहे.

परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अद्याप आपल्या कार्यकर्त्यांना तसे आदेश दिलेले नसल्यानं भाजपच्या गोटात चिंता पसरलीय. मोदी फॅक्टरमुळं विजयी होण्याचा विश्वास किरीट सोमय्या व्यक्त करतायत. राष्ट्रवादीच्या या मराठी कार्डच्या खेळीमुळं काही मते संजय दीना पाटलांच्या पारड्यात पडतील यात शंका नाही. परंतु आपच्या मेधा पाटकर मात्र त्यांच्या झोपडपट्टीतल्या हक्कांच्या मतावर डल्ला मारण्यात यशस्वी होतील.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 16, 2014, 09:07
First Published: Wednesday, April 16, 2014, 09:25
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?