दादांचे निर्णय चुकले, अजित पवारांना घरचा आहेर

दादांचे निर्णय चुकले, अजित पवारांना घरचा आहेर
www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड

मावळ लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभवाला सामोर जावं लागल्यानंतर आता अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न चिन्ह उपस्थित व्हायला लागलंय.

पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश बेहल यांनीच दादांचे निर्णय चुकले असं सांगत दादांना घराचा आहेर दिलाय.
पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची मोठी फळी अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या कामाला लागली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज होती. पण दादांनी कसलीही कारवाई केली नाही त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला, असं सांगत शहराध्यक्ष योगेश बेहल यांनी थेट दादांवरच हल्ला चढवलाय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 21, 2014, 19:16
First Published: Wednesday, May 21, 2014, 20:04
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?