Last Updated: Thursday, June 12, 2014, 08:16
पिंपरी चिंचवडमधील निगडीमध्ये राहणा-या जनाबाई गोरे. जनाबाई या भागात ओळखल्या जातात त्या एक बांधकाम व्यवसायिक म्हणून. कधीही शाळेत न गेलेल्या आणि अंत्यक प्रतिकूल परिस्थिती मधून आलेल्या जनाबाईंचा सामान्य कामगार ते एक बांधकाम व्यावसायिक हा प्रवास कोणालाही थक्क करणारा असाच.
Last Updated: Wednesday, May 21, 2014, 20:04
मावळ लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभवाला सामोर जावं लागल्यानंतर आता अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न चिन्ह उपस्थित व्हायला लागलंय.
Last Updated: Saturday, February 22, 2014, 22:59
पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी. चार वर्षांच्या एका चिमुकलीवर एकाचवेळी दहा ते बारा कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झालीय.
Last Updated: Friday, February 7, 2014, 19:48
पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेशी यांची अखेर आज बदली करण्यात आली. पिंपरी-चिंचवडचे बुलडोझर मॅन अशी त्यांची ओळख होती. बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई केल्याने त्यांची राष्ट्रवादीने उचल बांगली केली आहे. त्यांची महानिरिक्षक मुद्रांक शुल्क म्हणून बदली करण्यात आली आहे.
Last Updated: Sunday, December 29, 2013, 20:14
पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटना थांबता थांबत नाहीयेत. शहरात आज सकाळी एका ठेकेदाराची हत्या करण्यात आलीय. धक्कादायक म्हणजे त्याच्याच कामगाराने त्याची हत्या केलीय. ही हत्या अनैतिक संबंधांच्या संशयावरुन झाल्याची माहिती मिळतेय.
Last Updated: Saturday, December 28, 2013, 22:14
समाज बदलला असं आपण कितीही म्हटलं तरी आजही अशा काही घटना घडत आहेत. ज्यामुळं आपण खरंच पुरोगामी आहोत का असा प्रश्न पडतो? पिंपरी-चिंचवड जवळ सोमाटणे फाटा इथं असाच समाजाचा मागासलेपणा दाखवणारी घटना घडलीय. इथं एका अल्पवयीन मुलीचा विवाह होत होता. पण मुलीच्या सुदैवानं आजीच्या सतर्कतेमुळं आणि मुलीच्या धाडसानं तो टळला.
Last Updated: Saturday, December 14, 2013, 22:17
पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय वातावरण तापायला लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:ला ताकदवान म्हणतंय. पण त्यांच्याकडे माझ्या विरोधात साधा उमेदवारही नाही, अश्या शब्दात शिरूरचे खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीला डिवचलंय. तर राष्ट्रवादीनं ही शिरूर यावेळी आमचीच राहणार, असं सांगत राजकीय वातावरण तापवलंय.
Last Updated: Monday, December 9, 2013, 22:29
पिंपरी-चिंडवडमधल्या अनधिकृत बांधकामांचा मुद्या चांगलाच पेटलाय. पुणे आणि पिंपरीमधल्या राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी राजीनामे दिलेत.
Last Updated: Monday, December 9, 2013, 17:54
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी राबविलेल्या एका विशेष मोहीमेत तब्बल ५१ आरोपी पोलिसांच्या गळाला लागलेत
Last Updated: Wednesday, November 27, 2013, 21:25
प्रेमाला कशाचंच बंधन नसतं... याचीच प्रचिती पिंपरी-चिंचवडमध्ये आलीय. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन एक जोडपं विवाह बंधनात अडकलं.
Last Updated: Wednesday, November 20, 2013, 21:39
मुलगी रणदीरकौर संधू आणि मुलगा राजेश खुशलानी हे दोघं पिंपरी-चिंचवडहून मुलीच्या वडिलांकडून हत्या होण्याची भीती असल्यानं हे दोघे मुंबईला पळून आले होते. त्यानंतर...
Last Updated: Tuesday, November 19, 2013, 22:27
काळ आला होता पण वेळ आली नव्हती... याचा प्रत्यय पिंपरी जवळच्या एका रेल्वे क्रॉसिंगवर आला...
Last Updated: Monday, October 21, 2013, 20:29
पिंपरी-चिंचवडमधली ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. केवळ पाच रुपयांसाठी शाळेत झालेल्या मारामारी दरम्यान पंधरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय.
Last Updated: Saturday, August 31, 2013, 12:11
पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एका मोठ्या सायबर गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. मोठी रक्कम जिंकल्याचा ई मेल पाठवून लोकांना फसवणा-या एका व्यक्तीला पिंपरी चिंचवड मधल्या एम आय डी सी पोलिसांनी ताब्यात घेतलयं. त्यान पिंपरी चिंचवड मधल्या एका नागरिकाला तब्बल ५६ लाखांचा गंडा घातल्याचं उघड झाले आहे.
Last Updated: Thursday, July 25, 2013, 07:28
पिंपरी-चिंचवडमध्ये हिंजवडी परिसरात एका नव विवाहित दाम्पत्याचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. मोहन चौधरी आणि त्यांची पत्नी नैनु चौधरी असं या नवविवाहित दाम्पत्याचं नाव आहे.
Last Updated: Thursday, June 6, 2013, 17:17
पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेशी यांची गाडी अडवून त्यांना शिवीगाळ करण्यात आलीय. बेकायदा बांधकामाविरोधात नागरिकांनी आयुक्तांवर रोष व्यक्त केलाय
Last Updated: Wednesday, December 26, 2012, 00:08
पिंपरी चिंचवडमध्ये काल रात्री चिखली परिसरात झालेल्या गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात ४५ वर्षीय आर टी ओ एजंट बाळासाहेब मिसाळ यांचा मृत्यू झालाय. यामुळं पिंपरी चिंचवड मधील गुन्हेगारीनं कळस गाठल्याचं सिद्ध झालंय.
Last Updated: Sunday, October 21, 2012, 23:37
गेल्या सहा महिन्यात शहरात २० आत्महत्या झाल्यात. विशेष म्हणजे त्यात तब्बल ७० टक्के आत्महत्या शालेय आणि महविद्यालय तरुणांनी केल्यात.
Last Updated: Friday, October 12, 2012, 13:31
ज्या सागरमाथा वीरांनी पिंपरी चिंचवडचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात मोठं केलयं त्या विरांच्या इच्छेला नव्या अपेक्षा देऊन नुस्ती टांगणी लावण्याचं काम महापालिका करत आहे.
Last Updated: Wednesday, October 10, 2012, 20:27
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने एकच खळबळ उडालीये. ग्राहकाच्या मागणीनुसार कॉलगर्ल पुरविणा-या टोळीला पिंपरी पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी अटक केली.
Last Updated: Tuesday, September 25, 2012, 14:08
पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीत मेट्रो प्रकल्प राबवायला सर्वसाधारण सभेनं मंजुरी दिलीय. पिंपरी-चिंचवड पालिका भवन ते स्वारगेट या मार्गाची लांबी १६ किलोमीटर इतकी आहे. तसंच या मार्गावर एकूण १५ थांबे असतील.
Last Updated: Wednesday, September 5, 2012, 09:25
पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी पुन्हा एकदा एका चालकानं धुडगूस घालत संतोष माने प्रकरणाच्या आठवणी जाग्या केल्या. यामध्येही एकाला नाहक आपल्या प्राणांना मुकावं लागलंय तर एक जण गंभीर जखमी झालाय.
Last Updated: Wednesday, July 11, 2012, 13:26
‘दिव्या खाली अंधार’ ही म्हण सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेला तंतोतंत लागू पडतेय. बेकायदा बांधकामावर हातोडा चालवणाऱ्या महापालिकेचीच इमारतच बेकायदा असल्याचं समोर आलंय.
Last Updated: Monday, June 18, 2012, 20:50
गोळीबाराच्या सलग दोन घटनांनी रविवारी पिंपरी-चिंचवड शहर हादरून गेले. चिंचवडच्या विद्यानगर येथे झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास निगडीमध्ये आणखी एक गोळीबाराची घटना घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली.
Last Updated: Tuesday, May 22, 2012, 15:37
राजकारणी काय करतील याचा नेम नसतो. पिंपरी चिंचवडच्या नगरसेवकांचा असाच एक उपद्व्याप सुरु आहे. केवळ एका बिल्डरला खुश ठेवण्यासाठी एक अख्खा तलावच बुजवण्याचं काम सध्या इथं सुरू आहे.
Last Updated: Wednesday, May 2, 2012, 19:13
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं रिंगण पाहाण्याची संधी यंदाही पिंपरी चिंचवडकरांना मिळणार आहे. यंदाही पिंपरी चिंचवडच्या एच ए मैदानावर तुकाराम पालखीचं गोल रिंगण १२ जूनला तारखेला होणार आहे.
Last Updated: Sunday, April 22, 2012, 14:05
पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक भूखंडांचा निवासी वापराला प्रतिबंध करण्याचा प्रस्ताव पालिकेत गुंडाळण्यात आलाय. बिल्डर लॉबीचा दबाव आणि अर्थकारणामुळे प्रस्ताव गुंडाळल्याचा आरोप विरोधकांनी केला. औद्योगिक भूखंडांचा वापर निवासी वापरासाठी करता येणार असल्यानं आता बिल्डरांची चांदी होणार असल्याचं स्पष्ट झालंय.
Last Updated: Saturday, March 24, 2012, 21:43
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात कायमस्वरुपी नोकरी मिळेल या आशेने कंत्राटी तत्वावर काम करणा-या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रशासनानं क्रूर चेष्टा केल्याचं समोर आलंय. कामावर कायमस्वरुपी करण्याऐवजी त्यांना नोकरीवरुनच काढून टाकण्यात आलंय.
Last Updated: Wednesday, March 21, 2012, 08:15
पिंपरीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना आता त्यांना गॅस टंचाईचाही सामना करावा लागतो आहे. राष्टवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आझम पानसरे हे राज्याच्या ग्राहक कल्याण आणि सल्लागार समितीचे अध्यक्ष असताना ही टंचाई निर्माण झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे.
Last Updated: Monday, March 12, 2012, 21:51
पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी मोहिनी लांडे यांची निवड होणं ही फक्त औपचारिकता उरली आहे. मोहिनी लांडे यांच्या निवडीमुळे विलास लांडेंची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
Last Updated: Thursday, March 1, 2012, 20:55
पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडवरही पाणीकपातीची टांगती तलवार आहे. विशेष म्हणजे ही पाणीटंचाई जाणीवपूर्वक केल्याचा आरोप होतोय. निवडणुका संपताच राजकारण्यांनी त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केलीय.
Last Updated: Tuesday, February 28, 2012, 21:01
पुण्याच्या पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांना हटवण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्यानंतर दादांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त आशीष शर्मांनाही लवकरच घालवण्याचे संकेत दिलेत.
Last Updated: Saturday, February 25, 2012, 17:50
पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं महापालिकेत २/३ बहुमत मिळवलं असलं तरी आता महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू झाल्यानं अजितदादांसमोर नवीन डोकेदुखी निर्माण झाली आहे.
Last Updated: Thursday, February 23, 2012, 15:49
पिंपरी-चिंचवड महापालिका महापौरपदाच्या शर्यतीत आमदार विलास लांडे यांच्या पत्नी मोहिनी लांडे यांचं नाव आघाडीवर आहे. पण त्याचबरोबर अनेक अनुभवी नगरसेवकांनीही या पदावर दावा केला आहे. मात्र, नेते अजित पवार मोहिनी लांडे यांना संधी देतील का, याचीच चर्चा आहे.
Last Updated: Wednesday, February 22, 2012, 19:27
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीला एकहाती सत्ता मिळाल्यावर आता शहरात महापौर कोण याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. महापौरपदाच्या शर्यतीत आमदार विलास लांडे यांच्या पत्नी मोहिनी लांडे यांचं नाव आघाडीवर आहे. पण त्याचबरोबर अनेक अनुभवी नगरसेवकांनीही या पदावर दावा केला आहे.
Last Updated: Sunday, February 19, 2012, 17:51
पिंपरी चिंचवडच्या सांगवीतल्या जनतेला प्रशांत शितोळे आणि हर्शल ढोरे यांच्यातला वाद नवीन नाही. निवडणुकीपूर्वी दोन्ही गटात झालेल्या वादात तुषार ढोरेची हत्या झाली होती.
Last Updated: Thursday, February 16, 2012, 08:50
मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर या राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.
Last Updated: Monday, February 13, 2012, 14:27
पिंपरी-चिंचवडमध्ये आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगणार आहे. महापालिकेच्या रणधुमाळीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. अजित पवारांच्या पिंपरी-चिंचवडच्या बालेकिल्ल्यात स्वतः मुख्यमंत्री आज सभा घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांची पहिलीच जाहीर सभा पिंपरीत होते आहे.
Last Updated: Tuesday, February 7, 2012, 20:51
मनपा निवडणुकांच्या प्रचाराचे धूमशान सुरु झालं आहे. मात्र राजकीय पक्षांमध्ये मुद्यांऐवजी गुद्याची लढाई सुरु झालीय. पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हाणामारी झाली.
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या वैदुवस्ती प्रभागातून रामदास बोकड बिनविरोध निवडून आलेत.
Last Updated: Tuesday, January 24, 2012, 23:04
महापालिका निवडणूकांच्या उमेदवारांची अजून घोषणा झाली नसली तरी पिंपरी चिंचवडमध्ये सध्या महापौर योगेश बहल आणि यशवंत भोसले या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील संभाव्य लढतीची जोरदार चर्चा सुरू आहे.
Last Updated: Saturday, January 21, 2012, 23:56
राजकारणाच्या आखाड्यात उतरण्यासाठी तरूण पिढीही उत्सुक झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुकीच्या तिकीटासाठी उत्सुक असलेल्या १९ वर्षाच्या तरूणीनं अजित पवारांना सडेतोड उत्तरं देऊन उमेदवारीवर दावा सांगितला.
Last Updated: Tuesday, January 17, 2012, 20:40
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला. अजित पवार यांचे निकटवर्तीय जगदीश शेट्टी आणि त्यांचे नगरसेवक भाऊ उल्हास शेट्टी यांचं जात प्रमाणपत्रं खोटं असल्याचा आरोप शिवसेना खासदार गजानन बाबर यांनी केला आहे.
Last Updated: Tuesday, January 3, 2012, 18:44
अजित पवार पिंपरी-चिंचवड मध्ये आपली ताकद दाखविण्यास सज्ज झाली आहे, कारण की आता पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभुमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद दाखविणार आहे.
Last Updated: Friday, December 30, 2011, 17:58
'कोंबडी पळाली' या गाण्याने साऱ्यांनाच अक्षरश: वेड लावलं आहे, काही वर्षापूर्वी आलेल्या या गाण्याने आपल्या तालावर साऱ्यांनाच थिरकायाला लावले. तर आता याच कोंबडी पळाली गाण्याने पिंपरी-चिंचवडचे महापौर योगेश बहल यांना देखील नाचायाला भाग पाडलं आहे.
Last Updated: Monday, December 5, 2011, 08:53
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजितदादा असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसनं पिंपरी चिंचवडची जबाबदारी हर्षवर्धन पाटलांवर टाकली आहे. तर राष्ट्रवादीच्या अजिदादांकडं पिंपरी चिंचवडचं पालकत्व आहे.
Last Updated: Sunday, December 4, 2011, 17:09
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजितदादा असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं अजितदादांनी आत्ताच जोरदार मोर्चेबांधणी केलीये. तर हर्षवर्धन पाटलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस चिंचवडच्या मैदानात उतरली आहे.
आणखी >>