राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून पैशाचे वाटप

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून पैशाचे वाटप
www.24taas.com, झी मीडिया, कल्याण

कल्याणमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या डोंबिवली एमआयडीसीतल्या ऑफिससमोर राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांना पैसे वाटताना ताब्यात घेण्यात आलंय. सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. या कार्यकर्त्यांकडून १ लाख २१ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केलीय.

रिक्षाचालकांना त्यांच्या रिक्षावर जाहिरात लावण्यासाठी प्रत्येकी १ हजार रुपये मोबदला देत असताना हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी आनंद परांजपे यांच्याशी संपर्क साधला असता, यामध्ये आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करून कारवाई करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी राष्ट्रवादीच्या नासीर खान, मुकेश चित्ते आणि प्रशांत बागुल या तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. मानपाडा परिसरातील आनंद परांजपे यांच्या कार्यालयाजवळ काही रिक्षाचालकांना त्यांच्या रिक्षावर पोस्टर आणि बॅनर लावून प्रचार करण्यासाठी पैशांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार इथे छापा टाकण्यात आला. तिघांकडून आनंद परांजपे यांचे फोटो असलेले बॅनर आणि पोस्टर्सही जप्त करण्यात आले.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Tuesday, April 1, 2014, 11:26
First Published: Tuesday, April 1, 2014, 11:42
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?