भाजपनंतर राष्ट्रवादीही देणार सोशल मीडियावर भर

भाजपनंतर राष्ट्रवादीही देणार सोशल मीडियावर भर

www.24taas.com,झी मीडिया, मुंबई

भाजपच्या पावलावर पाऊल ठेऊन आता राष्ट्रवादीही सोशल मीडियाच्या प्रचारावर भर देणार आहे.

जयंत पाटील, आर. आर. पाटील, शशिकांत शिंदे, नवाब मलिक, सचिन अहिर, सुप्रिया सुळे, राहुल नार्वेकर यांच्यावर प्रभावी भूमिका मांडण्यासाठी प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

राज्यात झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रवादीनं आता पुढची रणनीती आखायला सुरुवात केलीय.

राष्ट्रवादीच्या 2 दिवसांच्या बैठकीला आज मुंबईत सुरुवात झालीय. कार्यकर्त्यांचं बळ वाढवण्यासाठी 8 किंवा 9 जूनला मुंबईत राष्ट्रवादी मेळावा घेणार आहे.

राज्यातल्या राष्ट्रवादीच्या दारुण पराभवानंतर आता शरद पवार यांनी राज्यात पक्षाची सूत्रे पूर्णपणे आपल्या हाती घेतल्याचं सांगितलं जातंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 22, 2014, 20:22
First Published: Thursday, May 22, 2014, 20:22
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?